Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

धोनीला ट्रोल करणं शोएब मलिकला महागात, भारतीयांचं सडेतोड प्रत्युत्तर

पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याने दिलेल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा त्याच्याच अंगाशी आल्या आहेत.

धोनीला ट्रोल करणं शोएब मलिकला महागात, भारतीयांचं सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई : पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याने दिलेल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा त्याच्याच अंगाशी आल्या आहेत. ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना शोएब मलिकने धोनीसोबतचा एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये धोनी खाली मान घालून उभा आहे, तर शोएब मलिक जल्लोष करताना दिसत आहे. शोएब मलिक याच्या ट्विटवर भारतीयांनी जोरदार निशाणा साधला आहे.

२०१२-१३ साली बंगळुरूमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान टी-२० मॅचवेळचा हा फोटो आहे. या मॅचमध्ये मलिकने नाबाद ५७ रनची खेळी करुन पाकिस्तानला जिंकवून दिलं होतं. भुवनेश्वर कुमारने पाकिस्तानची अवस्था १२/३ अशी केल्यानंतर मोहम्मद हफीज आणि शोएब मलिकने पाकिस्तानचा डाव सावरला होता.

शोएब मलिकने पाकिस्तानकडून ३५ टेस्ट, २८७ वनडे आणि १११ टी-२० आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या. २०१९ वर्ल्ड कपनंतर मलिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वर्ल्ड कपमध्ये ३ मॅचमध्ये फक्त ८ रन केल्यानंतर शोएब मलिकला डच्चू देण्यात आला होता. २०१९ वर्ल्ड कपमध्ये मलिक २ वेळा पहिल्याच बॉलला शून्यवर आऊट झाला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध खराब झाल्यानंतर दोन्ही टीम फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटची द्विदेशीय सीरिज २०१३ साली झाली होती. २०१३ साली पाकिस्तानचा ३ मॅचच्या वनडे सीरिजमध्ये २-१ने विजय झाला होता, तर टी-२० सीरिज १-१ने बरोबरीत सुटली होती.

Read More