Shardul Thakur Ukhana : टीम इंडियाचे अनेक खेळाडून नुकतेच लग्न बंधनात अडकले आहेत. अशातच नुकतंच टीम इंडियाचा लॉर्ड म्हणजेच शार्दूल ठाकूरने देखील मितालीसोबत सातफेरे घेतले आहेत. शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) प्रेयसी मिताली पारुळकरबरोबर (Mittali Parulkar) लग्नबंधनात अडकला. दोघांनी सोमवारी (27 फेब्रुवारी 2023) मुंबईमध्ये मराठमोळ्या पद्धतीने लग्न केलं. अशातच मराठमोळ्या शार्दुलने त्याची पत्नी मितालीसाठी खास उखाणा घेतला आहे. दरम्यान याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
शार्दुल आणि मितालीचं लग्न अगदी थाटामाटात झालं. लग्नाच्या आधी संगीत तसंच हळदीचा कार्यक्रम देखील झाला. शार्दूलचा हळदीतील डान्सचा व्हिडीओही चांगलाच गाजला. या कार्यक्रमांमधील फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर यासारखे खेळाडू आपल्या कुटुंबियांबरोबर या कार्यक्रमांना उपस्थित होते.
लग्नबंधनात अडकल्यानंतर मराठमोठ्या परंपरेप्रमाणे शार्दुलने मिताली एक खास उखाणा घेतला. शार्दूलने घेतलेल्या उखाण्यामध्ये क्रिकेटचाही समावेश असल्याचं दिसून आलं. शार्दूलने घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये तो म्हणतो, बॉलिंग करतो क्वीक... रन पण धावतो क्वीक... मिताली आमची सुंदरतेचं प्रतीक...
क्या बात हैं @imShard
— Bhaskar Ganekar (@BhaskarGanekar) March 1, 2023
अस्सल #AllRounder @sunandanlele सर आवडला का pic.twitter.com/yw9osqVbpG
दरम्यान शार्दूलचा हा उखाला तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच फार आवडलाय. शार्दूलची पत्नी मितालीलाही हा उखाणा आवडला असून उखाणा ऐकून ती देखील हसून टाळ्या वाजवताना दिसतेय.
भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, अभिषेक नायर आणि मुंबईतील संघांशीसंबंधित सिद्देश लाडही या कार्यक्रमांना उपस्थित होते. सध्या या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. शार्दुलची ओळख लॉर्ड शार्दुल अशी आहे. त्यामुळेच आपल्या लाडक्या लॉर्डला त्याचे अनेक चाहते शुभेच्छा देत आहेत. या लग्नाला उपस्थित असणाऱ्या अनेकांनी फोटो पोस्ट करुन या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.