Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Shardul Thakur Marriage: 2 दिवसांवर लग्न असताना क्रिकेटर शार्दूलचा व्हिडीओ होतोय व्हायरल!

के एल राहुल आणि अक्षर पटेलनंतर आता लॉर्ड शार्दूल देखील त्याची होणारी पत्नी मिताली पारूळेकरसोबत सात फेरे घेणार आहे. येत्या 27 फेब्रुवारी रोजी हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे. 

Shardul Thakur Marriage: 2 दिवसांवर लग्न असताना क्रिकेटर शार्दूलचा व्हिडीओ होतोय व्हायरल!

Shardul Thakur Marriage: टीम इंडियामध्ये सध्या अनेक खेळाडू लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. नुकतंच के.एल राहुलने (KL Rahul) अभिनेत्री आथिया शेट्टीशी लग्न केलं. तर टीम इंडियाचा गोलंदाज अक्षर पटेलनेही (Axar Patel) त्याची गर्लफ्रेंड मेहासोबत लग्नगाठ बांधली आहे. अशातच आता टीम इंडियाचा अजून एक खेळाडू लवकरच सातफेरे घेणार आहे. हा खेळाडू म्हणजे मराठमोळा गोलंदाज शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) .

के एल राहुल आणि अक्षर पटेलनंतर आता लॉर्ड शार्दूल देखील त्याची होणारी पत्नी मिताली पारूळेकरसोबत सात फेरे घेणार आहे. येत्या 27 फेब्रुवारी रोजी हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे. मात्र त्यापूर्वी शार्दूला ठाकूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ शार्दुलच्या हळदीच्या कार्यक्रमाचा आहे. 

शार्दूलचा हळदीतील डान्सचा व्हिडीओ व्हायरल

मुंबईमध्ये टीम इंडियाच्या क्रिकेटरचा हळदी समारंभ पार पडला. यावेळी या समारंभात शार्दूल त्याचं कुटुंब आणि मित्रमंडळींच्या सोबत झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसला. त्याच्या या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. 

नोव्हेंबरमध्ये उरकला साखरपुडा

शार्दुल आणि मिताली या दोघांचा नोव्हेंबर 2021 मध्ये साखरपुडा झाला होता. शार्दुलने त्याच्या साखरपुड्यामध्येही तुफान डान्स केला होता, त्यावेळीही शार्दूलचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होत होता. दरम्यान शार्दुल ठाकूर 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतरच लग्नाच्या बेडीत अडकणार होता. मात्र काही कारणास्तव त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं. 

शार्दूलची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

शार्दुल ठाकूरने ऑगस्ट 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केलं होतं. त्याने भारतासाठी आतापर्यंत एकूण 8 टेस्ट सामने, 34 वनडे सामने आणि 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत. शार्दूलने गोलंदाजीमध्ये 27 विकेट्स घेतले असून फलंदाजी करताना 254 रन्स केलेत. याशिवाय त्याने वनडे सामन्यांमध्ये एकूण 50 विकेट घेतल्यात. 

Read More