Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

शेन वॉर्न म्हणतो, हे २ वर्ल्ड क्रिकेटमधील 'ऑल टाईम ग्रेट बॅटसमन'

ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी क्रिकेटर स्पिनर शेन वॉर्न याने (Shane Warne) दोन ऑल टाइम महान क्रिकेटर्सची नावं सांगितली आहेत.

शेन वॉर्न म्हणतो, हे २ वर्ल्ड क्रिकेटमधील 'ऑल टाईम ग्रेट बॅटसमन'

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी क्रिकेटर स्पिनर शेन वॉर्न याने (Shane Warne) दोन ऑल टाइम महान क्रिकेटर्सची नावं सांगितली आहेत. शेन वॉर्नच्या मते त्यांच्या बॉलिंगवर या दोन क्रिकेटर्सने खूप जास्त रन्स काढल्या. तसेच या क्रिकेटर्सना आऊट करणे कठीण होतं, असंही स्पष्टपणे शेनवॉर्नने सांगितलं आहे. एवढंच नाही शेन वॉर्नने त्यांच्या काळातील क्रिकेटमधील अनेक इंटरेस्टिंग बाबी सांगितल्या आहेत.

शेनवॉर्नने या दोनही क्रिकेटर्सना ऑल टाईम ग्रेटस बॅटसमन असं म्हटलं आहे. यात भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा समावेश आहे. तर वेस्ट इंडिज टीमचा माजी क्रिकेटर ब्रायन लारा देखील महान क्रिकेटर असल्याचं शेन वॉर्नने म्हटलं आहे.fallbacks

माझ्या काळात सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा हे खूप चांगले खेळणारे क्रिकेटर होते. मला असं वाटतं की माझ्या त्या काळात ते दोन सर्वोत्कृष्ट बॅटसमन होते. हे दोनही खेळाडू वर्ल्ड क्रिकेटमधील महान खेळाडूमधील एक आहेत. या खेळाडूंना बॉलिंग करणे मला खूप आवडायचं. एखाद्या दिवशी हे बॅटसमन चांगल्या रन्स काढायचे. पण कधी कधी मी त्यांना आऊट करण्यास यशस्वी होत असे.     शेन वॉर्न असंही सांगतो की लोक आम्हाला, सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा आणि मला बिग थ्री म्हणून बोलवायचे. मला असं वाटतं की, आम्ही तीन क्रिकेटर्सने क्रिकेटला इंटरेस्टिंग आणि रोमांचक बनवलं, यामुळे क्रिकेट फॅन्सना क्रिकेटची खरी मजा लुटता आली.

दुसरीकडे शेन वॉर्न याने स्पिन बॉलिंगवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.  वॉर्न असं म्हणतो की, या वेळी वर्ल्ड क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट बॉलर हे स्पिनर्सच आहेत. कुणीही हा विचार केला नव्हता की, टी २० सारख्या क्रिकेटमध्ये स्पिनर बॉलर्स टिकू शकतील. अशा वेळी जगातील १० सर्वोत्कृष्ट बॉलर्समध्ये ९ स्पिनर्स आहेत, असं वॉर्न म्हणतो.

Read More