Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'रोहित ज्या पद्धतीने..', आफ्रिदी 'हिटमॅन'च्या प्रेमात! बाबरला टोला; म्हणाला, 'आमचे प्रोडक्टच..'

Shahid Afridi Targets Babar Azam Mention Rohit Sharma: भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यानंतर रोहित शर्माचं सर्वात आधी अभिनंदन करणाऱ्यांमध्ये शाहीद आफ्रिदीचा समावेश

'रोहित ज्या पद्धतीने..', आफ्रिदी 'हिटमॅन'च्या प्रेमात! बाबरला टोला; म्हणाला, 'आमचे प्रोडक्टच..'

Shahid Afridi Targets Babar Azam Mention Rohit Sharma: भारतीय संघ 2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माचं अभिनंदन करणाऱ्या पहिल्या काही आजी-माजी खेळाडूंमध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीही होता. 29 जून रोजी झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 7 धावांनी पराभूत करत तब्बल 17 वर्षानंतर पुन्हा एकदा टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. भारताच्या या विजयामधून पाकिस्तानने धडा घेतला पाहिजे असं म्हणत आफ्रिदीने बाबार आझमच्या नेतृत्वाखालील आपल्या देशाच्या संघाला कानपिचक्या दिल्या आहेत.

पाकिस्तानची सुमार कामगिरी

भारताने टी-20 वर्ल्ड कपची फायनल शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकल्यानंतर शाहीद आफ्रिदीने कर्णधार रोहितबरोबरच भारतीय संघाचंही कौतुक केलं आहे. भारतीय संघाचं कौतुक करताना शाहीद आफ्रिदीने आपल्या संघाला तसेच कर्णधार बाबर आझमला लक्ष्य केलं आहे. भारताने दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकत ऐतिहासिक कामगिरी केलेली असताना या स्पर्धेत बाबरच्या नेतृत्वाखालील संघाला साखळी फेरीतच बाहेर पडावं लागलं. पाकिस्तानच्या संघाला अमेरिकेसारख्या नवख्या संघानेही पराभूत केलं. भारताकडूनही पराभूत झाल्याने पाकिस्तानचा संघ सुपर 8 फेरीमध्येच स्पर्धेबाहेर फेकला गेला. 

नक्की वाचा >> मैदानावरील Wolf Salute सेलिब्रेशन अन् 5000 जणांचा मृत्यू... नव्या वादाला फुटलं तोंड

रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव

भारताच्या विजयानंतर पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शाहीद आफ्रिदीने कणखर नेतृत्व असणं गरजेचं असतं असं म्हटलं आहे. "तुमचं नेतृत्व करणारी व्यक्ती कशी आहे याबरोबरच त्याची भूमिकाही फार महत्त्वाची असते. जी कर्णधाराची देहबोली असते तसाच संघही मैदानात वावरतो. नेतृत्व करणाऱ्याने आदर्श घालून देणं गरजेचं असतं. रोहित शर्माचं उदाहरणं घ्या. तो ज्या पद्धतीने खेळतो ते पाहा. त्याच्या खेळाची शैली वाखाणण्याजोगी आहे. कर्णधारालाच आक्रमक फलंदाजी करायला आवडत असल्याने भारतीय संघातील तळाचे फलंदाजही अगदी आत्मविश्वासाने मैदानात फलंदाजीसाठी उतरल्याचं पाहाला मिळतं. त्यामुळेच मला कर्णधाराची भूमिका फार महत्त्वाची वाटते," असं शाहीद आफ्रिदी म्हणाला.

नक्की वाचा >> 'निर्ल्लज संधीसाधू...', रोहित शर्मा, विराटचा उल्लेख करत जय शाहांवर टीका; 'जगभरात कुठेही...'

आमच्या मूळ प्रोडक्टमध्येच गडबड

पाकिस्तानी संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना शाहीद आफ्रिदीने, "पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांच्या डोक्यात काय विचार सुरु आहेत मला कल्पना नाही. मी सुद्धा आता नेमके काय बदल केले जाणार याची वाट पाहत आहे. मी कायमच संघाची पाठराखण केली आहे. सकारात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे. वरवरचे बदल काही उपयोगाचे ठरणार नाही. आमच्या क्रिकेटच्या मूळाशीच अडचणी आहेत. तळागाळातील क्रिकेटसंदर्भात अनेक समस्या आहेत त्या मान्य केल्या पाहिजेत. अगदी तळागाळातील आमचे प्रोडक्ट्स (खेळाडूच) कमकूवत आहेत. मात्र तिथे नीट लक्ष देऊन गुंतवणूक केल्यास उत्तम खेळाडू तयार होऊ शकतात," असं शाहीद आफ्रिदी म्हणाला. 

Read More