Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

झिम्बाब्वेकडून पराभवानंतर ढसाढसा रडला पाकिस्तानचा हा खेळाडू, VIDEO व्हायरल

PAK vs ZIM : पराभव या खेळाडूच्या इतक्या जिव्हारी लागला की त्याला अश्रृ अनावर झाले.

झिम्बाब्वेकडून पराभवानंतर ढसाढसा रडला पाकिस्तानचा हा खेळाडू, VIDEO व्हायरल

T20 world cup 2022 : झिम्बाब्वेने गुरुवारी पर्थ येथे पाकिस्तानचा (Zim vs Pak) पराभव केलाय. आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 च्या गट 2 च्या रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा 1 धावांने पराभव केला. झिम्बाब्वे (PAK vs ZIM) विरुद्ध पाकिस्तान सामना रोमांचक ठरला. बाबर आझमचा संघ 131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयशी ठरला. विजयानंतर झिम्बाब्वे संघ मैदानावर नाचला मात्र पाकिस्तानचा एक खेळाडू पवेलिअन मध्ये जावून रडला.

कर्णधार बाबर आणि यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान लवकर बाद झाल्यानंतर पाकिस्तानची मधली फळी पुन्हा फ्लॉप झाली. शान मसूदने काही धावा केल्या. पण तो विजयापर्यत संघाला पोहोचवू शकला नाही.

चौथ्या विकेटसाठी 52 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. ज्यामुळे पाकिस्तानचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. पण कमी ओव्हरमुळे झिम्बाब्वेला फायदा झाला आणि त्यांनी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नेला. शेवटी त्यांनी विजय मिळवला.

सर्व पाकिस्तानी खेळाडू आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर निराशा होती आणि काहींना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. शादाब खान पॅव्हेलियनच्या आत रडत होता. एका सहकाऱ्याने त्याचे सांत्वन केले, त्यानंतर तो आत गेला.

हा व्हिडिओ एका चाहत्याने शूट केला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उरलेल्या तीन सामन्यांपैकी एकही सामना गमावणे पाकिस्तानला परवडणारे नाही आणि उपांत्य फेरी गाठण्याची त्यांची शक्यता देखील इतर संघ कशी कामगिरी करतात यावर अवलंबून आहे.

Read More