Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

सचिन तेंडुलकरची कन्या 'या' समस्येमुळे हैराण

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल  मीडियावर कायम  अ‍ॅक्टिव्ह असते.

सचिन तेंडुलकरची कन्या 'या' समस्येमुळे हैराण

मुंबई : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल  मीडियावर कायम  अ‍ॅक्टिव्ह असते. सारा तेंडुलकरचं फॅन फॉलोइंग देखील लाखोत आहे. सारा आपल्या सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. तिचा स्टाईलिश अंदाज पाहून अनेकवेळा चाहतेदेखील हैराण होतात. एवढंच नव्हेतर, साराला बऱ्याच सिनेमांच्या देखील ऑफर आल्या आहेत. नुकताच साराने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो तुफान व्हायरल होत आहे.

केसांच्या समस्येमुळे सारा हैराण
सारा तेंडुलकरने हा लेटेस्ट व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंन्टवर शेअर केला आहे. जो की तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.  व्हिडिओत आपण पाहू शकतो की, सारा केसांना हात लावून कंटाळवाण्या एक्सप्रेशन देत आहे. याच्या काही सेकंदानंतर तिचे विस्कटलेले केस सरळ होतात. आणि साराचा ग्लॅमरस लूक पहायला मिळतो. केस ठिक झाल्यानंतर सारादेखील खूश होते. या व्हिडिओमध्ये साराने ब्लॅक कलरच्या शॉर्ट फुल स्लिव्स टॉप आणि ग्रे कलरचा पैजामा परिधान केला आहे. सारा या लूकमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत साराने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'खुद से थोडा प्यार'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बॉलिवूड स्टार्सच्या कमेंन्ट
सारा तेंडुलकरच्या या व्हिडिओला आता पर्यंत 2 लाखपेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. या व्हिडिओवर बॉलिवूड स्टार्सदेखील भरभरुन कमेंट करत आहेत. प्रसिद्ध गायिका कनिका कपूरने साराच्या या पोस्टवर हार्ट ईमोजी शेअर केल्या आहेत. त्याचबरोबर सिंगर हर्षदीप कौरने 'प्रिटी वुमन' अशी कमेंट केली आहे. अशाप्रकारे साराच्या पोस्टवर चाहते कमेंटचा वर्षाव करत आहेत.

Read More