Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

...म्हणून सानिया ऑस्ट्रेलिया ओपन टूर्नामेंटमध्ये खेळू शकणार नाही!

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्जा ही पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑस्टेलिया ओपन टेनिस टूर्नामेंटमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. 

...म्हणून सानिया ऑस्ट्रेलिया ओपन टूर्नामेंटमध्ये खेळू शकणार नाही!

कोलकता : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्जा ही पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑस्टेलिया ओपन टेनिस टूर्नामेंटमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. जयदीप मुखर्जी अकादमीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या झप्रेमजीत लाल इंविटेशनल टेनिस टूर्नामेंटमध्ये तिने ही माहिती दिली. 

काय म्हणाली सानिया ?

तिने सांगितले की, "माझ्या गुडघ्याला दुखापत झाल्याने खूप त्रास होत आहे. मी चालू शकते, पण खेळू शकत नाही. ही सर्वात मोठी समस्या आहे."

भारताच्या या ३१ वर्षीय स्टार टेनिसपटूने सांगितले की, मी गेल्या महिन्यात माझ्या तज्ञांशी यासंदर्भात बोलले. त्यांनी सध्या आरामाचा सल्ला दिला आहे. यावर इंजेक्शनने काय परिणाम होतो हे पाहणार आहेत. किंवा मग सर्जरीचा सल्ला देण्यात आला आहे.सानियाने सांगितले की, मी यासंदर्भात आता स्पष्टपणे सांगू शकणार नाही. मात्र हे नक्की की मी पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑस्टेलिया ओपन टेनिस टूर्नामेंटमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. त्याचबरोबर तिला टेनिस कोर्टात परतण्यासाठी वेळ लागेल, असे तिने सांगितले. मात्र राष्ट्रीय खेळात आणि आशियाई स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची तिने आशा वर्तवली आहे. 

प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी

प्रेमजीत लाल इंविटेशनल टेनिस टूर्नामेंट तीन दिवस चालणार आहे. याला सानियाने प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. तिच्यासोबत भारतातील दिग्गज खेळाडू विजय अमृतराज आणि सोमदेव देववर्मन देखील सहभागी झाले होते. 

 

Read More