Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आणखी एका खेळाडूचा मुलगा घेतोय क्रिकेटचे धडे!

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची श्रीलंकेविरुद्धच्या अंडर १९ यूथ टेस्टसाठी भारतीय टीममध्ये निवड झाली.

आणखी एका खेळाडूचा मुलगा घेतोय क्रिकेटचे धडे!

कोलंबो : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची श्रीलंकेविरुद्धच्या अंडर १९ यूथ टेस्टसाठी भारतीय टीममध्ये निवड झाली. तर राहुल द्रविडचा मुलगाही शालेय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करतो आहे. आता यामध्ये आणखी एका क्रिकेटपटूच्या मुलाची भर पडू शकते. श्रीलंकेचा आक्रमक बॅट्समन सनथ जयसूर्या सध्या त्याच्या मुलाला क्रिकेटचे धडे देत आहे. सनथ जयसूर्यानं फेसबूकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सनथ जयसूर्या नेटमध्ये मुलाला बॉलिंग टाकत आहे. जयसूर्याप्रमाणेच त्याचा मुलगाही डावखुरा आहे.

सनथ जयसूर्यानं शेअर केलेला हा व्हिडिओ २० लाखांपेक्षा जास्त जणांनी बघितला आहे. ४४५ वनडेमध्ये जयसूर्यानं १३,४३० रन केल्या तर ११० टेस्टमध्ये जयसूर्याच्या ६,९७३ रन आहेत. १९९६ साली श्रीलंकेनं जिंकलेल्या वर्ल्ड कपमध्ये जयसूर्यानं महत्त्वाची भूमिका बजावली होती. 

Read More