Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

बर्थ डे स्पेशल : कोचच्या 'या' वाक्यामुळे सचिन तेंडुलकरचं आयुष्यचं बदललं

''सचिन रमेश तेंडुलकर'' आज या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. 

बर्थ डे स्पेशल : कोचच्या 'या' वाक्यामुळे सचिन तेंडुलकरचं आयुष्यचं बदललं

मुंबई : सचिन रमेश तेंडुलकर आज या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. 24 एप्रिल 1973 मध्ये जन्मलेला सचिन आज 45 वर्षाचा झाला. त्याच्या बिंदास खेळामुळे आज देशातील करोडे क्रिकेटप्रेमी त्याला पुजतात. भारतरत्न सचिन तेंडुलकर याने क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करून घेतले आहेत. आणि आज तेच रेकॉर्ड तोडणं प्रत्येक क्रिकेटर्सला कठीण होत आहे. याच रेकॉर्डमुळे सचिन आज चाहत्यांच्या मनातील ताईच बनला आहे. 

सचिन तेंडुलकर जरी आज रिटायर असला तरीही तो अनेक भावी क्रिकेटर्सचा आदर्शन आहे. एम एस धोनी, विरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली सारख्या या क्रिकेटर्सने अनेकदा सांगितले आहे की, क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरची बॅटिंग बघून त्यांनी अनेक गोष्टी शिकल्या आहेत. 

fallbacks

आचरेकर सरांच्या 'त्या' गोष्टीमुळे बदललं संपूर्ण आयुष्य 

खूप कमी लोकांना माहित आहे की, सचिन लहानपणी खूप मस्तीखोर होता. मोठा भाऊ अजित तेंडुलकर त्याला कोचिंग करता रमाकांत आचरेकर सरांकडे घेऊन गेला. आचरेकर सरांकडे सुरूवातीच्या काळात शिकताना सचिन देखील इतर मुलांप्रमाणे नियम न पाळणारा विद्यारथी होता. तेव्हा आचरेकर सरांनी सचिनला दिलेला दम हा त्याचं संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी महत्वाचा ठरला. ही माहिती स्वतः सचिन तेंडुलकरने शेअर केली होती. आणि तो म्हणला होता की, आचरेकर सरांच्या त्या वाक्यामुळे माझं संपूर्ण आयुष्यच बदललं. 

स्वतः सचिनने शेअर केली 'ती' गोष्ट 

2017 च्या ट्विटमध्ये सचिनने सांगितल होतं की, माझ्या शाळेच्या दिवसांमधील ही गोष्ट आहे. मी शारदाश्रम विद्यामंदीर शाळेतून ज्युनिअर टीमकडून खेळत असे. आमची सिनीअर टीम वानखेडे स्टेडिअममध्ये हॅरिस शील्डची फायनल खेळत होती. त्यावेळी आचरेकर सरांनी माझ्यासाठी एक प्रॅक्टीस मॅचचे आयोजन केलं होतं. शाळा सुटल्यानंतर त्यांनी मला तेथे जायला सांगितलं.

fallbacks

आचरेकर सर म्हणाले की, मी त्या संघाच्या कॅप्टनशी बोललो आहे. तुला चौथ्या क्रमांकावर बॅटिंग दिली जाईल. मात्र सचिन तेथे न जाता  वानखेडे स्टेडिअमवर सीनिअर संघाला चीअर करायला गेला. आणि आचरेकर सरांनी विचारलं की तू तिथे किती रन केलेस तेव्हा त्याने सत्य परिस्थिती सांगितली. हे ऐकताच आचरेकर सगळ्यांसमोर सचिनला ओरडू लागले. 

आचरेकर सचिनला म्हणाले की, दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवण्याची गरज नाही. तू तुझ्या क्रिकेटवर लक्ष दे. असं काही तरी मिळव की दुसरे लोक तुझ्या खेळावर टाळ्या वाजवतील. आणि सचिन म्हणतो की, माझ्यासाठी हे खूप मोठं वाक्य होतं. ज्याने माझं संपूर्ण आयुष्यच बदलंल. 

Read More