Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'आक्रमकता चांगली, पण त्याचा हा अर्थ नाही', सचिन नाराज

म्हणून ती मॅच बघून सचिन तेंडुलकर निराश झाला

'आक्रमकता चांगली, पण त्याचा हा अर्थ नाही', सचिन नाराज

मुंबई : जगातला सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून ज्याची गणना होते, त्या सचिन तेंडुलकरने त्याची नाराजी जाहीर केली आहे. भारत-बांगलादेश यांच्यात अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये जे काही झालं त्याबाबत मी निराश असल्याचं वक्तव्य सचिनने केलं आहे. आक्रमकता दाखवण्यासाठी तोंड उघडण्याची किंवा चुकीची भाषा वापरण्याची गरज नाही, असं सचिन म्हणाला आहे.

अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये बांगलादेशने भारताचा ३ विकेटने पराभव केला होता. मॅच संपल्यानंतर दोन्ही टीमच्या खेळाडूंमध्ये राडा झाला होता. आयसीसीनेही काही खेळाडूंना निलंबित केलं आहे.

या सगळ्या वादाविषयी सचिनने एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली. 'नाजूक परिस्थितीमध्ये काही गोष्टींवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. संपूर्ण जग तुम्हाला पाहत आहे, हे विसरता कामा नये. अशा क्षणांमध्ये नियंत्रित आक्रमकता मदत करते. खेळाडूंनी आक्रमक असावं, पण चुकीची भाषा वापरणं म्हणजे आक्रमकता नव्हे. टीमला मदत करण्यामध्येच तुमची आक्रमकता दिसली पाहिजे, टीमच्या विरुद्ध जाण्यात नाही,' असं परखड मत सचिनने मांडलं आहे. 

Read More