Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

T20 world Cup 2021 च्या पहिल्या सामन्यात पाहा कोणी मारली बाजी

आज सुपर 12 चा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगला.

T20 world Cup 2021 च्या पहिल्या सामन्यात पाहा कोणी मारली बाजी

अबुधाबी : ICC T-20 World Cup च्या पहिल्या सुपर 12 सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (SA vs AUS) यांच्य़ात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावात 20 षटकात 9 बाद 118 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 119 धावांचे लक्ष्य दिले. दुसऱ्या डावात कांगारू संघाने 19.4 षटकात 5 बाद 121 धावा करत हा सामना पाच विकेटने जिंकला. (SA vs AUS who won the first match of T20 world Cup 2021)

दुसऱ्या डावात कर्णधार अॅरॉन फिंचने शून्यावर विकेट गमावली, तर डेव्हिड वॉर्नर 14 धावा करून रबाडचा बळी ठरला. मिशेल मार्शला 11 धावांवर केशव महाराजने आऊट केलं. स्टीव्ह स्मिथने 35 धावांचे योगदान दिले आणि नार्त्जेचा बळी ठरला, तर ग्लेन मॅक्सवेलने 18 धावा केल्या आणि तबरीझ शम्सीने त्याला क्लीन बोल्ड केले. यानंतर स्टॉइनिसने नाबाद 24 आणि मॅथ्यू वेडने नाबाद 15 धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिला धक्का कर्णधार तेंबा बवुमाच्या रूपाने बसला, तो 12 धावांवर मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. वान डेर डुसेर 2 रनवर हायडलवुडच्या बॉलिंगवर आऊट झाला. क्विंटन डी कॉक फार काही करू शकला नाही आणि जोस हेडलवूडच्या बॉलवर 7 धावांवर क्लीन बोल्ड झाला.

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन

आरोन फिंच (क), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोस हेझलवूड

दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन

टेंबा बावुमा (क), क्विंटन डी कॉक (डब्ल्यूके), एडन मार्क्राम, व्हॅन डर डसर, डेव्हिड मिलर, एनरिक क्लासेन, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, केशव महाराज, एनरिक नारखिया

Read More