Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'हा' स्टार फुटबॉलपटू एकाच वेळी करणार दोन गर्लफ्रेन्डशी विवाह!

उल्लेखनीय म्हणजे, या दोघींचीही या विवाहाला मान्यता आहे. 

'हा' स्टार फुटबॉलपटू एकाच वेळी करणार दोन गर्लफ्रेन्डशी विवाह!

नवी दिल्ली : ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डिनो लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे... पण, त्याचा हा विवाह मात्र थोडा 'हटके' असेल... कारण, रोनाल्डिनो एकाच वेळी दोन महिलांशी विवाह करणार आहे... आणि यासाठी हे तिघंही खूपच आनंदात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ब्राझिलियन फुटबॉलपटू आपल्या दोन्ही गर्लफ्रेन्डस प्रिसिला कोएल्हो आणि बिट्रिज सूजा यांच्यासोबत ऑगस्ट महिन्यात विवाह करणार आहे. या दोघींचीही या विवाहाला मान्यता आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रिसिला आणि बिट्रिज या दोघीही गेल्या डिसेंबर महिन्यापासून माजी बार्सिलोना स्टारसोबत त्याच्या पाच मिलियन पाऊंडच्या 'रिओ दी जेनेरिओ मेन्शन'मध्ये 'सामंजस्यानं' एकत्रच राहत आहेत. 

fallbacks
रोनाल्डिनो, प्रिसिला आणि बिट्रिज

रोनाल्डिनोनं २०१६ मध्ये बिट्रिजसोबत डेटिंग सुरू केली होती... परंतु, यानंतरही त्यानं प्रिसिलासोबत आपलं नातं तोडलं नाही... प्रिसिला हिलाही रोनाल्डोच्या नव्या नात्यावर आक्षेप नव्हता. प्रिसिला - रोनाल्डिनो गेल्या अनेक वर्षांपासून नात्यात आहेत. 

उल्लेखनीय म्हणजे, ब्राझीलचा विश्वकप विजेता फुटबॉलपटू रोनाल्डिनोनं याच वर्षी जानेवरी महिन्यात फुटबॉलमधून संन्यास घेतलाय. त्यानं २००२ मध्ये विश्वकप जिंकण्यात ब्राझिलियन टीममध्ये महत्त्वपूर्ण योगदानही दिलं होतं. 

Read More