Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

LSG vs MI : 'करो या मरो' सामन्यात रोहित ट्रंप कार्ड घेऊन उतरणार मैदानात; अशी असेल प्लेईंग 11

LSG vs MI Playing XI: आज संध्याकाळी मुंबई सुपर जाएंट्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. यावेळी टीमची प्लेईंग 11 कशी असणार आहे, यावर नजर टाकूया.

LSG vs MI : 'करो या मरो' सामन्यात रोहित ट्रंप कार्ड घेऊन उतरणार मैदानात; अशी असेल प्लेईंग 11

LSG vs MI Playing XI: आयपीएलमध्ये ( IPL 2023 ) आज संध्याकाळी मुंबई सुपर जाएंट्स ( Lucknow Super Giants ) विरूद्ध मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) यांच्यात सामना रंगणार आहे. लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही टीमसाठी हा सामना 'करो या मरो' या स्थितीचा असणार आहे. जी टीम हा सामना जिंकेल ती प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकणार आहे. 

आयपीएलच्या यंदाच्या सिझनमधील हा 63 वा सामना रंगणार आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई ( Mumbai Indians ) 14 पॉईंट्ससोबत तिसऱ्या लखनऊ 13 पॉईंट्ससोबत चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान दोन्ही टीम्स हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी टीमची प्लेईंग 11 कशी असणार आहे, यावर नजर टाकूया.

ओपनिंग जोडी बदलणार का?

मुंबईच्या टीममध्ये कर्णधार रोहित शर्मा ( Rohit sharma ) काही बदल करणार का हे पाहावं लागणार आहे. लखनऊविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्मा आणि इशान किशन ( Ishan Kishan ) हे दोघं ओपनिंग करणार आहेत. यांच्या जोडीमध्ये बदल होणार नाहीये. या दोघांकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा केली जातेय. मिडल ऑर्डरमध्ये आज तिलक वर्माची ( Tilak Varma ) एंट्री होऊ शकते. कॅमेरून ग्रीनच्या जागी त्याला संधी मिळू शकते.

टीम इंडियाचा मिस्टर 360 डिग्री म्हणजेच सूर्यकुमार यादवला या सामन्यात संधी देण्यात येईल. गुजरातविरुद्ध शतक झळकावणाऱ्या सूर्याकडून पुन्हा मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. याशिवाय टीम डेव्हिड, नेहल वढेरा यांना देखील टीममध्ये संधी देण्यात येईल.

अर्जुन तेंडुलकरला दाखवणार बाहेरचा रस्ता?

नुकतंच अर्जुन तेंडुलकरला कुत्रा चावला असल्याचं समोर आलंय. शिवाय गेल्या काही सामन्यांपासून त्याचा टीममध्येही समावेश करण्यात येत नाही. त्यामुळे लखनऊविरूद्धच्या सामन्यात त्याला संधी मिळण्यावर शंका व्यक्त करण्यात येतेय. मुंबई इंडियन्सकडून अर्जुनने 4 सामने खेळले असून 3 विकेट्स काढण्यात त्याला यश आलंय.

मुंबई इंडियन्सची संभाव्या प्लेईंग 11

ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेविड, ख्रिस जॉर्डन, अर्शद खान पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय

Read More