Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs ENG : मालिका विजयानंतर रोहित शर्माचा हार्दिक पांड्याला टोला? म्हणाला 'ज्यांना भूक नाही त्यांना...'

Rohit Sharma Statement : रोहितचा टोला नेमका कोणाला होता? असा सवाल विचारला जातोय. रणजी क्रिकेट न खेळणाऱ्या इशान किशनला रोहितने टोला लगावलाय? की हार्दिक पांड्याला? अशी चर्चा होताना दिसतेय.

IND vs ENG : मालिका विजयानंतर रोहित शर्माचा हार्दिक पांड्याला टोला? म्हणाला 'ज्यांना भूक नाही त्यांना...'

Rohit Sharma in youngsters hunger for Test cricket : टीम इंडियाने रांची (Ind vs Eng Ranchi Test) येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात दमदार विजय नोंदवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयासह रोहित अँड कंपनीने मालिकेत 3-1 ने विजय मिळवला. ध्रुव जुरैल, आकाश दीप यांच्यासारख्या युवा खेळाडूंनी सामन्यात चमक दाखवल्याने सध्या त्यांचं कौतूक होताना दिसत आहे. अशातच आता कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील युवा खेळाडूंचं तोंडभरून कौतूक केलंय. त्यावेळी एका प्रश्नावर उत्तर देताना रोहितने हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) टोला लगावला की काय? असा सवाल विचारला जातोय.

रोहित शर्मा म्हणतो...

जेव्हा जेव्हा तुम्ही मालिका जिंकता तेव्हा तुम्हाला बरं वाटतं. ही मालिका आमच्यासाठी खूप कठीण होती आणि आव्हानात्मक होती. देशांतर्गत क्रिकेटमधून मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळणं नेहमी कठीण असतंय, त्यामुळे आपण युवा खेळाडूंना तसं वातावरण तयार करून देतो. जुरैलने दोन्ही डावात संयमी खेळ दाखवला आणि उत्तम फिनिशर म्हणून काम केलं. त्याने चारही बाजूने फटकेबाजी केली अन् 90 धावांची खेळी केली होती. त्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला होता, असं रोहित शर्मा म्हणतो.

कोणत्याही युवा खेळाडूंना कधीही प्रेशर बाहेरून नसतं तर आतून असतं. त्यांना करियर सेट करण्यासाठी योग्य संधी दिली गेली पाहिजे, असं रोहित शर्मा म्हणाला. त्यावेळी त्याला युवा खेळाडूंच्या टेस्टच्या इच्छेवर प्रश्न विचारला गेला तेव्हा, 'पाहा... ज्यांना टेस्ट क्रिकेटची भूक नाही, त्यांच्या चेहऱ्याकडून पाहून कळून जातं, मग त्यांना खेळवून फायदा काय आहे? असा सवाल रोहितने विचारला. रोहितच्या या वक्तव्यानंतर रोहितचा टोला नेमका कोणाला होता? असा सवाल विचारला जातोय. रणजी क्रिकेट न खेळणाऱ्या इशान किशनला रोहितने टोला लगावलाय? की हार्दिक पांड्याला? अशी चर्चा होताना दिसतेय.

टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

टीम इंग्लंड - बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.

Read More