Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

विराट हारल्यावर उड्या मारल्या, पण आता रोहितला आलं टेन्शन; संजय बांगर म्हणतात...

Virat Kohli Injury: आरसीबी हारल्याने मुंबई इंडियन्सच्या (MI) डगआऊटमध्ये एकच जल्लोषाचं वातावरण दिसतंय. रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील आनंदाने नाचताना दिसला. आता रोहितचं हेच हसणं गायब झालंय, एका वाईट बातमीमुळे...

विराट हारल्यावर उड्या मारल्या, पण आता रोहितला आलं टेन्शन; संजय बांगर म्हणतात...

RCB Coach Sanjay Bangar on Virat Kohli Injury: इंडियन प्रिमियम लीगच्या अखेरच्या लीग सामन्यात आरसीबी प्लेऑफच्या  (IPL 2023 Playoffs) शर्यतीतून बाहेर झाली. त्यामुळे लाखो बंगळुरू चाहत्यांच्या स्वप्नांचा चुराडा झालाय. आरसीबी हारल्याने मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये संधी मिळालीये. त्यामुळे मुंबईच्या (MI) डगआऊटमध्ये एकच जल्लोषाचं वातावरण दिसतंय. रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील आनंदाने नाचताना दिसला. आता रोहितचं हेच हसणं गायब झालंय, एका वाईट बातमीमुळे... गुजरातविरुद्धच्या सामन्यात विराट (Virat kohli) जखमी झाल्याची बातमी आली आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC 2023 Final) फायनलसाठी कॅप्टन असलेल्या रोहितच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालंय.

शतक झळकावल्यानंतर कोहलीने विजय शंकरचा शानदार घेतला. मात्र, त्यावेळी त्याच्या गुडघ्याला दुखापत (Virat Kohli Injury) झाली. कोहलीला मदत करण्यासाठी फिजिओ धावून आला पण विराटला मैदान सोडावं लागलं. शेवटची पाच ओव्हर विराट डगआऊटमध्ये बसलेला दिसला. त्यामुळे रोहित शर्माची देखील धाकधूक वाढलीये. अशातच आता आरसीबीचे कोच संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी विराटच्या हेल्थ अपडेटवर महत्त्वाची माहिती दिलीये.

काय म्हणाले संजय बांगर ?

होय, विराटच्या गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली आहे पण ती गंभीर आहे, असं मला वाटत नाही. त्याने चार दिवसांत सलग सामन्यात शतके ठोकली आहेत. तो असा खेळाडू आहे ज्याला केवळ फलंदाजीतच नव्हे तर फिल्डिंगही आपलं पूर्ण योगदान द्यायला आवडतं. विराट मैदानात खूप धावलाय. मागील काही सामन्यात तो 40 ओव्हर मैदानावर राहिलाय, असंही संजय बांगर (Sanjay Bangar on Virat Kohli Injury) यांनी म्हटलं आहे.

WTC चा थरार...

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम सामना येत्या 7 जूनपासून सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाची टीम कंबर कसताना दिसतीये. मात्र, भारतीय संघाचे खेळाडू आयपीएलमध्ये जखमी होत आहेत. मंगळवारी इंग्लंडसाठी टीम इंडियाचे सात खेळाडू रवाना होणार आहेत. सात भारतीय खेळाडूंमध्ये कोहलीचा समावेश आहे.

आणखी वाचा - प्लेऑफसाठी काहीही? रोहित शर्माने बोलून दाखवली उपकाराची भाषा; पाहा काय म्हणाला...

अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, विराट कोहली, उमेश यादव, जयदेव उनाडकट आणि आर अश्विन या सात खेळाडूंना सामन्याआधीच रवाना करण्यात येणार आहे. बाकीचे खेळाडू हे आयपीएल संपल्यानंतर लंडनला रवाना होतील. त्याचबरोबर अंकित चौधरी, आकाशदीप आणि यारा पृथ्वीराज या तीन नेट्स बॉलर्सचा देखील टीममध्ये समावेश आहे. सध्या चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्येच काऊंटी क्रिकेट खेळतोय. त्यामुळे आता टीम इंडियाचा विजय आणखी सोपा होणार का? असा सवाल आता विचारला जातोय.

Read More