Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'त्याच्या'कडे कुणाचंच लक्ष गेलं नाही; धोनीच्या आनंदात चाहते रोहित शर्माचं दुःख विसरले

7 व्या सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर रोहित शर्मा फार हताश दिसून आला.

'त्याच्या'कडे कुणाचंच लक्ष गेलं नाही; धोनीच्या आनंदात चाहते रोहित शर्माचं दुःख विसरले

मुंबई : यंदाचा आयपीएलचा सिझन मुंबई इंडियन्ससाठी एक वाईट स्वप्न आहे. 7 सामन्यांमध्ये मुंबईला एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. यामुळे मुंबईचा यंदाच्या आयपीएलमधील प्रवास जणू संपल्यातच जमा आहे. 7 व्या सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर रोहित शर्मा फार हताश दिसून आला. यावेळी त्याच्या डोळ्यात आलेलं पाणी अनेकांच्या लक्षात आलं नाही.

चेन्नईने मुंबईचा 3 विकेट्सने पराभव केला. हा सामना संपल्यानंतर संपूर्ण स्टेडियममध्ये धोनीच्या नावाचा जयघोष होत होता. यावेळी लाईमलाईटमध्ये केवळ धोनीच होता. मात्र दुसरीकडे त्याचवेळी रोहित शर्माचे डोळे पाणावले होते. सलग ७ सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर रोहित शर्माच्या डोळ्यात आलेलम पाणी कॅमेरामध्ये कैद झालं. 

आयपीएलच्या इतिहास पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा मैदानावर इतका नाराज दिसून आला. एककीडे धोनीच्या चौकारानंतर सर्वजण चेन्नईचा विजय साजरा करत होते. मात्र यावेळी कोणीही टीम इंडियाचा नवा कर्णधाराचं दुःख पाहिलं नाही. सध्या याचा व्हिडीयो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

मुंबई इंडियन्ससचा पुढील सामना लखनऊ सुपर जाएंटविरोधात आहे. या सामन्यात जर मुंबई इंडियन्सचा पराभव झाला तर अधिकृतरित्या मुंबई इंडियन्स आयपीएलच्या शर्यतीतून बाहेर पडेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे.

Read More