Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

ऋषभ पंत Urvashi Rautela यांच्या अफेअरमध्ये आला नवीन ट्विस्ट

 ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेलाच्या अफेअरमध्ये राजकिय नेत्याची उडी, 'हा' मोलाचा सल्ला दिला?

 ऋषभ पंत Urvashi Rautela यांच्या अफेअरमध्ये आला नवीन ट्विस्ट

मुंबई : टीम इंडियाचा विकेटकिपर ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi rautela) यांची नावे नेहमीच एकमेकांशी जोडली जातात. आज देखील मीडियांमध्ये या दोघांच्याच अफेअरची चर्चा आहे. या चर्चेमागचे कारण म्हणजे ऑस्ट्रेलिया आहे. हे कनेक्शन तुम्हाला सांगणारच आहोत, त्याआधी अफेअरमध्ये नवीन ट्विस्ट आला आहे. या दोघांच्या अफेअरमध्ये एका राजकिय नेत्याने एन्ट्री घेतली आहे. नेमका त्याचा 'या' अफेअरमध्ये काय रोल आहे, ते जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलिया कनेक्शन काय?
ऑस्ट्रेलियात (Austrailia) यंदाचा टी20 वर्ल्डकप (T20 World Cup) होतोय. या वर्ल्ड कपसाठी रोहित शर्माच्या (Rohit Sharma)  नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) रवाना झाली आहे. या संघात ऋषभ पंतचा (Rishabh Pant) देखील समावेश आहे. एकीकडे ऋषभ पंत ऑस्ट्रेलियात असताना, दुसरीकडे उर्वशी रौतेला देखील त्याच देशात पोहोचली आहे. या संदर्भातली तिने पोस्ट केल्यानंतर ऑस्ट्रेलिया कनेक्शनची चर्चा सुरु झाली. 

 

T20 World Cup साठी Urvashi Rautela ऑस्ट्रेलियात! नेटकरी म्हणाले, "ऋषभ पंतचे तर..."

 

पोस्टची एकच चर्चा 
उर्वशी रौतेलान (Urvashi rautela) तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये हार्ट इमोजी पोस्ट करत लिहिले आहे की, 'तुझ्या मनाचा वेध घेत मी ऑस्ट्रेलियाला आले.' हॅशटॅगमध्ये तिने आपले नाव लव्ह या इमोजीसह लिहिले आहे. अशा परिस्थितीत उर्वशी पंतला ऑस्ट्रेलियात भेटणार असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली आहे. 

नवीन ट्विस्ट काय?
उर्वशी रौतेला (Urvashi rautela) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्या अफेअरमध्ये आता एका राजकिय नेत्याने उडी घेतलीय. या राजकिय नेत्याने ऋषभ पंतला मोलाचा सल्ला दिला आहे. हे राजकिय नेते आहेत काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Singhvi). यांनी एक ट्विट केलं आहे. या टविट्मध्ये त्यांनी ऋषभला एका चांगल्या वकिलाची गरज असल्याचे म्हटलं आहे. दरम्यान जेष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी दिलेला हा मोलाचा सल्ला ऋषभ पंत घेणार का? हे येणाऱ्या काळातच कळणार आहे. 

दरम्य़ान जेष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Singhvi) यांनी दिलेल्या या सल्ल्यानंतर पुन्हा एकदा या दोघांच्या रिलेशनशिपवरून चर्चा सुरु झाली आहे. 

Read More