Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

जेव्हा राशिद खानने शॅम्पेनच्या बाटलीला स्पर्श करण्यास दिला नकार

राशिद खानने शॅम्पेनला नाही लावला हात... पाहा व्हिडिओ

जेव्हा राशिद खानने शॅम्पेनच्या बाटलीला स्पर्श करण्यास दिला नकार

मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये सध्या अफगानिस्तानचा खेळाडू राशिद खान याचं कौतूक होत आहे. राशिद आता फायनलमध्ये कशी कामगिरी करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. हैदराबादला पहिल्या क्वालिफायर सामन्यामध्ये चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. चेन्नईने हा सामना 2 विकेटने जिंकला होता. या सीजनमध्ये हैदराबादवर चेन्नई भारी पडली आहे. पण फायनल सामन्यामध्ये काय होणार याबाबत काहीही सांगता येत नाही.

पाहा व्हिडिओ

दुसऱ्या क्वालिफायर सामन्यामध्ये राशिदच्या शानदार कामगिरीमुळे कोलकात्यावर विजय मिळवत हैदराबाद फायनलमध्ये पोहोचला. कोलकात्याला पराभूत केल्यानंतर केक कापून हैदराबादच्या खेळाडूंनी हा विजय सेलिब्रेट केला. पण जेव्हा राशिदला शॅम्पेनची बॉटल ऑफर करण्यात आली तेव्हा त्याने बॉटलला स्पर्श करण्यास नकार दिला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनल्या आहेत.

Read More