Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Ranji Trophy : भारताला मिळाला नव्या दमाचा 'झहीर खान', 4 बॉलमध्ये उडवले 4 दांडके, पाहा Video

Ranji Trophy 2024 Madhya Pradesh vs Baroda : झहीर खानची गोलंदाजी आणि कुलवंत खेजरोलिया (Kulwant Khejroliya) याच्या गोलंदाजीत काहीसं साम्य दिसून येतंय. दोघंही डावखुरे फास्टर गोलंदाज आहेत. तर दोघंही बॉलची ग्रीप लपवून टाकतात. 

Ranji Trophy : भारताला मिळाला नव्या दमाचा 'झहीर खान', 4 बॉलमध्ये उडवले 4 दांडके, पाहा Video

Kulwant Khejroliya four wickets : सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy 2024) स्पर्धेत अनेक रंगतदार सामने पहायला मिळत आहेत. ड गटामधील मध्य प्रदेश आणि बडोदा (Madhya Pradesh vs Baroda) यांच्यात सामना खेळवला गेला होता. अशातच आता या सामन्यात मध्य प्रदेशने बडोद्याचा एक डाव आणि 52 धावांनी पराभव केलाय. मात्र, इंदूरच्या होळकर स्टेडियमवर बडोद्याविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाला एक नवा झहीर खानसारखा गोलंदाज मिळाल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे आता सिलेक्टर्सचं लक्ष या युवा गोलंदाजावर आहे. 

मध्य प्रदेश आणि बडोदा यांच्यातील सामन्यात कुलवंत खेजरोलिया (Kulwant Khejroliya) याने घातक गोलंदाजीचं प्रदर्शन करत 4 बॉलमध्ये 4 विकेट्स काढल्या. कुलवंत खेजरोलिया याने सामन्याच्या दुसऱ्या डावात 34 धावांत 5 बळी घेतले. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सलग 4 चेंडूत चार विकेट घेणारा तो केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे. मध्य प्रदेशने पहिल्या डावात 454 धावांचा डोंगर उभारला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना बडोदाचा संघ 132 धावांवर गारठला. त्यामुळे त्यांना फॉलोऑन घेण्याची वेळ आली. अशातच दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारेल, अशी शक्यता वाटत असताना मध्य प्रदेशच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली अन् बडोदाचा दुसरा डाव 270 धावांवर संपवला.

कुलवंत खेजरोलिया (Kulwant Khejroliya) याला त्याच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे. कुलवंत खेजरोलियाने बडोद्याच्या दुसऱ्या डावातील 95 व्या षटकातील दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर शाश्वत रावत, महेश पिठिया, भार्गव भट्ट आणि आकाश सिंग यांची विकेट घेतली. कुलवंत खेजरोलिया याच्या आधी दिल्लीचा शंकर सैनी आणि जम्मू-काश्मीरचा मोहम्मद मुधासीर यांनी 4 बॉलमध्ये 4 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

पाहा Video

दरम्यान, झहीर खानची गोलंदाजी आणि कुलवंत खेजरोलिया याच्या गोलंदाजीत काहीसं साम्य दिसून येतंय. दोघंही डावखुरे फास्टर गोलंदाज आहेत. तर दोघंही बॉलची ग्रीप लपवून टाकतात. त्यामुळे फलंदाजाला बॉल समजून येत नाही. झहीर खानने टीम इंडियासाठी नेहमीच उल्लेनिय कामगिरी केलीये. अशातच आता कुलवंत खेजरोलिया याला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळेल का? असा सवाल विचारला जातोय.

Read More