Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

राहुलचं वादळी अर्धशतक, पंजाबचा दिल्लीवर विजय

के.एल.राहुलनं केलेल्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर पंजाबनं दिल्लीचा ६ विकेटनं पराभव केला आहे.

राहुलचं वादळी अर्धशतक, पंजाबचा दिल्लीवर विजय

मोहाली : के.एल.राहुलनं केलेल्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर पंजाबनं दिल्लीचा ६ विकेटनं पराभव केला आहे. दिल्लीनं ठेवलेल्या १६७ रन्सचा पाठलाग करताना पंजाबनं १८.५ ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून १६७ रन्स केल्या. राहुलच्या अर्धशतकाबरोबरच करुण नायरनं ३३ बॉल्समध्ये ५० रन्स केले. तर डेव्हिड मिलरनं २३ बॉल्समध्ये नाबाद २४ आणि मार्कस स्टॉयनीसनं १५ बॉल्समध्ये २२ रन्स केले.

राहुलचं सर्वात जलद अर्धशतक

या मॅचमध्ये के.एल.राहुलनं आयपीएलमधलं सर्वात जलद अर्धशतक झळकावलं आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या मॅचमध्ये राहुलनं फक्त १४ बॉल्समध्येच अर्धशतक केलं. १६ बॉल्समध्ये ५१ रन्स करून राहुल आऊट झाला. राहुलच्या इनिंगमध्ये ६ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता.

गंभीरचं अर्धशतक

या मॅचमध्ये पंजाबनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. दिल्ली डेअरडेव्हिल्सनं २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १६६ रन्स केल्या आहेत. दिल्लीकडून कॅप्टन गौतम गंभीरनं सर्वाधिक ५५ रन्स केल्या. पण इतर कोणत्याही बॅट्समनना मोठी खेळी करता आली नाही. ऋषभ पंतनं १३ बॉलमध्ये २८ रन्स तर क्रिस मॉरिसनं १६ बॉलमध्ये नाबाद २७ रन्स केले.

पंजाबच्या मोहित शर्मा आणि मुजीब-उर-रहमाननं प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या तर अश्विन आणि अक्सर पटेलला प्रत्येकी एक विकेट मिळाली. 

Read More