Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

MI vs PBKS: सूर्याचं तेज पडलं फीकं; शेवटच्या ओव्हरमध्ये अर्शदीपने मुंबईच्या हातून हिरावला सामना

पंजाब किंग्स (Punjab kings) विरूद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांचा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर (MI vs PBKS) रंगला होता. या सामन्यात मुंबईला होम ग्राऊंडवरच पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय.

MI vs PBKS: सूर्याचं तेज पडलं फीकं; शेवटच्या ओव्हरमध्ये अर्शदीपने मुंबईच्या हातून हिरावला सामना

MI vs PBKS: पंजाब किंग्स (Punjab kings) विरूद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांचा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर (MI vs PBKS) रंगला होता. या सामन्यात मुंबईला होम ग्राऊंडवरच पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय. अगदी श्वास रोखून धरणाऱ्या या या सामन्यामध्ये पंजाबने मुंबईचा 13 रन्सने पराभव केला (Punjab defeated Mumbai by 13 runs) आहे. 3 विजयानंतर पुन्हा एकदा मुंबईच्या टीमला पराभवाला सामोरं जावं लागलंय.

सूर्यकुमार आणि ग्रीनची खेळी व्यर्थ

पंजाबच्या टीमने प्रथम फलंदाजी करत मुंबईला 215 रन्सचं टारगेट दिलं. याचा पाठलाग करताना मुंबईची पहिली विकेट अवघ्या 8 रन्सवर पडली. त्यानंतर कॅमेरून ग्रीन आणि रोहित शर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 76 रन्सची पार्टनरशिप केली. मात्र कर्णधार रोहित शर्मा 44 रन्सवर आऊट झाला. यावेळी सूर्या आणि ग्रीनने डाव सावरला आणि तुफान फटकेबाजीही केली.

आजच्या सामन्यात सूर्याची बॅट चांगलीच तळपली. सूर्याने 26 बॉल्समध्ये 57 रन्सची खेळी केली. त्याच्या या खेळीमध्ये 7 फोर आणि 3 सिक्सेसचा समावेश होता. तर ग्रीनने 43 बॉल्समध्ये 67 रन्स केले. 6 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने त्याने तुफान केळी केली. मात्र सूर्या आऊट झाल्यानंतर मुंबईच्या इतर फलंदाजांना सामना जिंकवून देता आला नाही. 

अर्शदीप सिंहने मुंबईचं जिंकण्याचं स्वप्न मोडलं

पंजाबसाठी या सामन्याचा खरा हिरो ठरला तो अर्शदीप सिंग. अर्शदिपनेने शेवटच्या ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. 20 व्या ओव्हरमध्ये त्याने तिलक वर्मा आणि नेहल बधेराला क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यावेळी त्याने 4 ओव्हर्समध्ये 29 रन्स देत 4 विकेट्स काढले. त्याच्या शेवटच्या ओव्हरमधील कामगिरीमुळेच पंजाबला हा सामना जिंकता आला.

पंजाबच्या कर्णधाराची तुफान खेळी

फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबची सुरुवात खास नव्हती. शॉर्ट 11 तर प्रभसिमरन सिंग 26 रन्सवर पव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर अर्जुनच्या घातक यॉर्करवर अथर्व 29 रन्स करून बाद झाला. अशामध्ये कर्णधार सॅम करनने मात्र एका बाजूने डाव सावरला. सॅमने आजच्या सामन्यात अर्धशतक झळकावले. सॅमने 29 बॉल्समध्ये 4 षटकार-5 चौकारांच्या मदतीने 55 रन्स केले. मुंबईकडून चावला-ग्रीनने 2-2 विकेट घेतल्या. तर अर्जुनला त्याच्या होमग्राऊंडवर पहिली विकेट मिळवण्यात यश आलंय.

Read More