Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पुण्याच्या ग्राऊंड स्टाफने धोनीला दिलं स्पेशल गिफ्ट

पुण्याच्या ग्राऊंट स्टाफचं धोनीला स्पेशल गिफ्ट

पुण्याच्या ग्राऊंड स्टाफने धोनीला दिलं स्पेशल गिफ्ट

पुणे : आयपीएलच्या 11व्या सीजनमध्ये अनेक नवे खेळाडू चर्चेत आहेत. पण त्यांच्यासोबत चर्चेत आहे ती धोनीची मुलगी जीवा. आयपीएल 2018 मध्ये चेन्नईच्या प्रत्येक सामन्यामध्ये जीवा तिच्या आईसोबत मैदानात दिसते. चेन्नईच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी दोघेही मैदानात येतात. जीवा देखील मैदानात आकर्षणाचं केंद्र बनली आहे.

चेन्नईच्या सामन्या दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. रविवारी पुण्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नईने हैदराबादचा 8 विकेटने पराभव केला. या सामन्यात विजयानंतर चेन्नईने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. या विजयानंतर पुण्याच्या ग्राउंड स्टाफने चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला एक खास गिफ्ट दिलं.

पुण्याच्या ग्राउंड स्टाफने महेंद्र सिंह धोनीला एक पोट्रेट गिफ्ट केलं. हे पोट्रेट महेंद्र सिंह धोनीचं आणि त्याच्या हातात आहे त्याची मुलगी जीवा. धोनीसाठी हे गिफ्ट खूप खास होतं.

Read More