Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पुलवामा हल्ला : शिखर धवनचा कवितेतून संदेश

पुलवामा दहशतवादी हल्ल्याविरोधात उत्साह निर्मिती व्हावी, या उद्देशाने शिखर धवनने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

पुलवामा हल्ला : शिखर धवनचा कवितेतून संदेश

मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात संताप आहे. हाच संताप भारतीय क्रिकेटपटू शिखर धवननं त्याच्या कवितेतून व्यक्त केला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शिखर धवननं ही कविता शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये धवन जीम मध्ये कसून सराव करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने कवितेच्या चार ओळी जोडल्या आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्याविरोधात उत्साह निर्मिती व्हावी, या उद्देशाने शिखर धवनने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

कवितेने शत्रूचा पराभव 

कवितेतील प्रत्येक शब्द हा उत्साह वाढवणारा आहे. त्यामुळे आपल्या शत्रूविरुद्ध आपल्याला बळ मिळेल, असे धवनचे म्हणने आहे. गुरुवारी १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे भारताचे ४० जवान दहशतवाद्यांचा भ्याड हल्ल्यात शहीद झाले. या पार्श्वभूमीवर धवनने हा व्हिडीओ शेअर केला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीयांमध्ये पाकिस्तान विरोधात संतापाची भावना आहे.

अशा आहेत कवितेच्या ओळी

धवनने आपला व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन म्हणून कवितेच्या ओळी शेअर केल्या आहेत. 

"जीत की खातिर बस जूनून चाहिए; 
जिसमे उबाल हो ऐसा खून चाहिए; 
ये आसमां भी आयेगा ज़मीं पर; 
बस इरादों में जीत की गूंज चाहिऐ।"

भारताविरुद्ध टी-२० आणि वनडे सीरिज खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाची टीम भारतात येणार आहे. या सीरिजला २४ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारतीय टीम आधी टी-२० सीरिज आणि मग वनडे सीरिज खेळेल. ही सीरिज वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे. वर्ल्ड कपआधी भारताची ही शेवटची सीरिज आहे.

Read More