Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2022 : पंजाब किंग्सची कॅप्टन्सी केएलनंतर त्याच्या खास मित्राकडे?

मित्र असा असावा, केएलनंतर पंजाबची कॅप्टन्सी त्याच्या मित्राकडे? पाहा कोण आहे तो?    

IPL 2022 : पंजाब किंग्सची कॅप्टन्सी केएलनंतर त्याच्या खास मित्राकडे?

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी ऑक्शन झालं आहे. टीम सेट झाल्या आहेत आता प्रतीक्षा आहे ती कर्णधारपदाची. यंदा 10 संघ आहेत आता त्यापैकी काही संघांचे कर्णधार अजून निश्चित होणं बाकी आहे. पंजाब संघाच्या कर्णधारपदासाठी दोन नावं आघाडीवर आहेत. 

असं म्हणतात मित्र असावा तर असा एलनंतर पंजाबची कॅप्टन्सी त्याच्या मित्राकडे येणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. के एल राहुलला पंजाबने सोडल्यानंतर आता पंजाबचं कर्णधारपद कोणाकडे जाणार याची उत्सुकता आहे. 

शिखर धवन आणि मयंक अग्रवाल या दोघांचं नाव सध्या कर्णधारपदासाठी आघाडीवर आहे. आयपीएलमधील विशेष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मयंक अग्रवालकडे कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यासाठी दिली जाऊ शकते. 

मयंक अग्रवाल आणि के एल राहुल खूप खास मित्र आहेत. त्यामुळे के एल राहुलच्या खास मित्राकडे कर्णधारपद येऊ शकतं. मात्र स्पर्धेत शिखर धवनही आहे. त्यामुळे आता स्पर्धा चुरशीची आहे.

यंदा आयपीएलचे 70 सामने 10 संघात खेळवले जाणार आहेत. 55 सामने मुंबईत आणि 15 सामने पुण्यात होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईतील डी वाय पाटील, ब्रेबॉन आणि वानखेडे अशा 3 स्टेडियमवर सामने होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. 

Read More