Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

या भारतीय खेळाडूची फॅन आहे ही पाकिस्तानची अँकर

भारतीय खेळाडूची पाकिस्तानी फॅन

या भारतीय खेळाडूची फॅन आहे ही पाकिस्तानची अँकर

नवी दिल्ली : जगभरात क्रिकेट खेळाडूंची लोकप्रियता खूप अधिक आहे. जगभरात खेळाडूंचे चाहते आहेत. पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट खूपच लोकप्रिय आहे. भारतात जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचं आयोजन केलं जातं. तर पाकिस्तानातही पीसीएलचं आयोजन होतं.

आयपीएलमुळे अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळाली आणि ते लोकप्रिय झाले. असंच काही घडलं आहे भारताचा क्रिकेटर के.एल राहुल याच्या बाबतीत. आपल्या जबरदस्त खेळीमुळे तो आयपीएलच्या सीजन 11मध्ये लोकप्रिय झाला. केएल राहुलने त्य़ाच्या खेळीने अनेकांचं मन जिंकलं. ज्यामध्ये पाकिस्तानची एक फॅन देखील आहे. राहुलची बॅटींग बघून ही पाकिस्तानी पत्रकार त्याची मोठी फॅन झाली.
 
केएल राहुलने आयपीएलच्या 38व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध पंजाबकडून खेळताना 54 बॉलमध्ये 84 रन्सची नाबाद खेळी केली होती आणि पंजाबला विजयी केलं होतं. राहुलची शानदार खेळी पाहिल्य़ानंतर पाकिस्तानची सुंदर स्पोर्ट्स अँकर जैनम अब्बासने एक ट्वीट करत राहुलचं कौतूक केलं होतं.

Read More