Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

तुरुंगाची हवा खाताना वकील महिलेवर जडला जीव! सिनेमापेक्षा कमी नाही 'या' बॉलरची लव्हस्टोरी

जेलची हवा खात असतानाच त्याचं वकील महिलेवर प्रेम जडलं. या दोघांनी पुढे लग्न केलं. हे दोघंही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

तुरुंगाची हवा खाताना वकील महिलेवर जडला जीव! सिनेमापेक्षा कमी नाही 'या' बॉलरची लव्हस्टोरी

मुंबई: प्रेम कधी कुठे केव्हा आणि कसं होईल हे सांगता येत नाही. पण हेच प्रेम पुढे निभावत लग्न करण्यासाठी मात्र मोठं धाडस लागतं. हेच धाडस वेगवान गोलंदाजाने केलं. जेलची हवा खात असतानाच त्याचं वकील महिलेवर प्रेम जडलं. या दोघांनी पुढे लग्न केलं. हे दोघंही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरची सध्या खूप चर्चा होत आहे. मोहम्मद आमिरच्या म्हणण्यानुसार, त्याच्याकडे यूके कार्ड आहे. कारण त्यांची पत्नी नर्जिस खान ही ब्रिटिश नागरिक आहे. मोहम्मद आमिर आणि नर्जिस खान यांना एक मुलगा आहे. या दोघांची लव्हस्टोरी एखाद्या सिनेमापेक्षाही कमी नाही असं म्हणायला हरकत नाही. 

2010मध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरवर मॅच फिक्सिंगचा आरोप होता. मॅच फिक्सिंगच्या गुन्ह्यांतर्गत त्याला तुरुंगात जावं लागलं होतं. त्यावेळी मोहम्मदची केस नर्जिसकडे आली. केस लढता लढता दोघांमध्ये प्रेम झालं. सामना फिक्सिंगमध्ये सामील झाल्यानंतर आमिरवर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. आमिर त्यावेळी 18 वर्षांचा होता. 2014 मध्ये मोहम्मद आमिर आणि नर्जिस खान यांचे लग्न झाले. 

2016 मध्ये पुन्हा मोहम्मद आमिरने पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला. पाकिस्तान क्रिकेटमधील अंतर्गत राजकारणामुळे 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला. ब्रिटिश नागरिक बनून मोहम्मद आमिर आयपीएल खेळण्याची तयारी करत असल्याच्या बातम्या आहेत. 

Read More