Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

एक सिनेमा पाहिला आणि सामना जिंकला, स्मिथने सांगितलं पंजाबच्या विजयाचं रहस्य

तो कोणता सिनेमा? ज्यामुळे पंजाबला बंगळुरूवर विजय मिळवण्यासाठी प्रेरणा मिळाली, स्मिथने सांगितलं रहस्य

एक सिनेमा पाहिला आणि सामना जिंकला, स्मिथने सांगितलं पंजाबच्या विजयाचं रहस्य

मुंबई : बंगळुरू विरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाब संघाने 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची दणदणीत सुरुवात पंजाबने केली. बंगळुरूच्या अनुजने ओडियन स्मिथचा कॅच सोडला. त्यानंतर पुढच्या 8 बॉलमध्ये त्याने धावांचा अक्षरश: पाऊस पाडला. 

स्मिथच्या तुफान फलंदाजीसमोर बॉलर्सनाही घाम फुटला. त्याला प्लेअर ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आलं. या विजयाचं रहस्य स्मिथनं सांगितलं आहे. एका सिनेमातून टीमला मोठी प्रेरणा मिळाली. ज्यामुळे संपूर्ण टीमचं मनोबल वाढलं आहे. 

स्मिथने दिलेल्या माहितीनुसार,' त्यांना 14 PEAKS नावाची एक डॉक्युमेंट्री दाखवण्यात आली. हा सिनेमा पाहिल्यानंतर टीममध्ये एक वेगळं बळ आलं. हा सिनेमा खूप प्रेरणा देणारा आहे. आतापर्यंत PBKS ला ट्रॉफी मिळवण्यात यश आलं नाही. त्यामुळे स्पर्धेच्या सुरुवातीलाच प्रेरणा देणारा हा सिनेमा पाहिल्याने बळ आलं.' 

'आम्ही सगळ्यांनी एक सिनेमा पाहिला. 14 PEAKS हा सिनेमा पाहिल्यानंतर जे बळ मिळालं ते खूप मोठं होतं. त्यामुळेच आम्ही सामनाही जिंकू शकलो. एक पिक सर केलं आहे अजून चौदा बाकी आहेत असं तो यावेळी म्हणाला.' 

स्मिथ पुढे बोलताना म्हणाला 'आम्ही एक चांगली सुरुवात करण्यावर भर देत आहोत. त्यामुळे आत्मविश्वास येतो. आमच्याकडे पावर हिटर असल्याने एक चांगली सुरुवात होऊ शकली ही संघासाठी चांगली गोष्ट आहे.' 

200 हून अधिक धावांचं लक्ष्य ठेवूनही पंजाब संघाने ते अगदी उत्तमपणे गाठलं आणि बंगळुरूचा पराभव केला. गेल्या हंगामात प्ले ऑफ पर्यंतही पोहोचणं पंजाबला कठीण झालं होतं. मात्र यंदा सुरुवात चांगली झाली आहे. 

Read More