Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

के एल राहुलबरोबर डेटच्या चर्चा! निधी अग्रवाल म्हणते...

क्रिकेटपटू आणि बॉलीवूड अभिनेत्रींचं नातं काही तुम्हा आम्हाला नवीन नाही.

के एल राहुलबरोबर डेटच्या चर्चा! निधी अग्रवाल म्हणते...

मुंबई : क्रिकेटपटू आणि बॉलीवूड अभिनेत्रींचं नातं काही तुम्हा आम्हाला नवीन नाही. विराट कोहली आणि युवराज सिंगनंतर आता के एल राहुलमुळे क्रिकेट आणि बॉलीवूड जवळ आल्याचं बोललं जातंय. के एल राहुल आणि अभिनेत्री निधी अग्रवाल यांचे फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत. राहुल आणि निधी अग्रवाल डिनर डेटला गेल्याचे हे फोटो आहेत. नुकतंच के एल राहुल आणि निधी अग्रवाल यांना मुंबईत एकत्र पाहिलं गेलं. राहुल आणि निधी मुंबईच्या वांद्रे भागातील एका रेस्टोरंटमध्ये डिनर करून बाहेर पडले आणि एका गाडीतूनच निघून गेले. निधी एक अभिनेत्री आणि मॉडल आहे. तीनं टायगर श्रॉफसोबत 'मुन्ना मायकल' या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता.

निधी अग्रवालची प्रतिक्रिया

राहुल हा माझा जुना मित्र आहे. आम्ही दोघं डिनरला गेलो होतो. राहुल क्रिकेटपटू आणि मी अभिनेत्री असल्यापासून एकमेकांना ओळखतो. आम्ही बंगळुरूमधल्या एकाच कॉलेजमध्ये गेलो नसलो तरी आम्ही एकमेकांना ओळखतो, अशी प्रतिक्रिया निधीनं स्पॉटबॉयला दिली आहे. 

Read More