Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

निदहास ट्रॉफी : वाद-विवाद, नागिण डान्स आणि अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला सामना

निदहास ट्रॉफी स्पर्धेतील श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील करो वा मरो सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला. काँटे के टक्कर झालेल्या या सामन्यात बांगलादेशने बाजी मारली. 

निदहास ट्रॉफी : वाद-विवाद, नागिण डान्स आणि अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला सामना

कोलंबो : निदहास ट्रॉफी स्पर्धेतील श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील करो वा मरो सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला. काँटे के टक्कर झालेल्या या सामन्यात बांगलादेशने बाजी मारली. 

या सामन्यात रोमांच, वादविवाद आणि जिंकल्यानंतर नागिण डान्स लोकांना पाहायला मिळाला. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेवर बांगलादेशने मात केली. 

या विजयात मोलाचा वाटा ठरला तो तमीम इक्बाल आणि महमुदुल्लाह यांचा. तमीमने ५० तर महमुदुल्लाहने ४३ धावांची जबरदस्त खेळी केली. आता फायनलमध्ये बांगलादेशचा मुकाबला भारताशी होणार आहे. 

बांगलादेशने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी केली. श्रीलंकेने २० षटकांत सात विकेटच्या मोबदल्यात १५९ धावा केल्या. बांगलादेशने हे लक्ष्य एक चेंडू राखत पूर्ण केले. 

बांगलादेशच्या विजयापेक्षा त्यांच्या वर्तनामुळे ही मॅच अधिक चर्चेत आली. अखेरच्या षटकांत सामन्यातील रोमांच आणखीनच वाढला

अखेरचे षटक

अखेरच्या षटकांत बांगलादेशला विजयासाठी १२ धावांची गरज होती. यावेळी इसुरु उदानाने अखेरच्या षटकातील पहिला बॉल मुस्तफीझुर रेहमानच्या दिशेने टाकला. मात्र बाऊंसर असल्याने तो खेळला नाही. त्यानंतर पुढचा बॉलही बाऊंसर होता. यावर रन घेण्याच्या नादात रेहमान बाद झाला. यानंतर ४ बॉलमध्ये श्रीलंकेला १२ धावा हव्या होत्या.

षटक सुरु असतानाच झाला वाद

अखेरचे षटक सुरु असताना बांगलादेश आणि श्रीलंकेतील खेळाडूंमध्ये वाद सुरु झाला. शाकिब अंपायरशी वाद घालू लागला आणि त्याने आपल्या टीमला माघारी बोलावे. यावेळी काही काळासाठी सामना थांबवण्यात आला. दरम्यान प्रशिक्षक खालिद मेहमूद यांनी बॅट्समनना पुन्हा बॅटिंगसाठी पाठवले आणि पुढच्याच बॉलवर महमूदुल्लाहने फोर मारला आणि त्यानंतर दोन रन्स काढले. अखेरच्या दोन बॉलमध्ये बांगलादेशला सहा रन्स हवे होते. यावेळी पाचव्या बॉलवर महमूदुल्लाहने षटकार मारला आणि स्टेडियममध्ये शांतता पसरली. श्रीलंकेचे चाहते शांत झाले. 

नागिण डान्स

या विजयानंतर बांगलादेशच्या क्रिकेटर्सनी मैदानावर नागिन डान्स करत विजयाचा जल्लोष साजरा केला. 

Read More