Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2023: निकोलस पूरनने उडवली किंग कोहलीची खिल्ली? नवीन-उल-हक सह असं काही केलं की... पाहा Video

Nicholas Pooran Video: नवीन-उल-हक याने (Naveen Ul Haq) आंब्याचा फोटो (Mango) शेअर करत विराटला डिवचण्याचा प्रयत्न केला. इन्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला होता. अशातच वेस्ट इंडिजचा क्रिकेटर निकोलस पूरन (Nicholas Pooran) याने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

IPL 2023: निकोलस पूरनने उडवली किंग कोहलीची खिल्ली? नवीन-उल-हक सह असं काही केलं की... पाहा Video

Virat Kohli, IPL 2023: आयपीएलचे सामने आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. त्यामुळे आता प्लेऑफमध्ये (IPL 2023 Playoff Scenario) कोण खेळणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्लेऑफमध्ये आयसीबी आणि लखनऊ सुपर जायटन्सचा एकतरी सामना पहायला मिळाला, अशी सर्वांची इच्छा आहे. त्याला कारण विराट कोहली (Virat Kohli) आणि नवीन-उल-हक (Naveen-ul-Haq) यांच्यातील भांडण. गंभीर (Gautam Gambhir) जरी असला तरी तो लांबच राहणार... मैदानात कोण कोणाला चोपणार? यासाठी लखनऊ आणि बंगळुरू सामना व्हायलाच हवा, अशी चर्चा होताना दिसते. अशातच आता एका व्हिडिओ सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

झालं गेलं विसरायचं नसतं, असं क्रिकेटमधला अलिखित नियम... भारत पाकिस्तान सामन्यात याचा प्रत्तय नेहमी पहायला मिळतो. अशातच ही परंपरा सुरू ठेवलीये विराट आणि नवीन-उल-हक यांनी. सामना झाला, भांडणं झाली, तरीही विराट आणि नवीन यांनी एकमेकांना डिवचणं काही सोडलं नाही. बंगळुरू आणि मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यानंतर नवीनने आंब्याचा फोटो टाकत विराटला डिवचण्य़ाचा प्रयत्न केला. इन्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला होता. त्यावरून मोठा वाद पेटला होता. नवीनवर कारवाईची मागणी देखील आरसीबी समर्थकांनी केली होती, अशातच वेस्ट इंडिजचा क्रिकेटर निकोलस पूरन याने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

आणखी वाचा - IPL 2023 PK vs DC: दिल्लीने फिरवला Playoffs चा गेम, आता कसं असेल समीकरण?

निकोलस पूरन याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. त्या व्हिडीओमध्ये पूरन स्वत: पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर येतो. त्यानंतर बोलताना 'हा कोण आहे याचा अंदाज लावा? असं म्हणत तो आपला कॅमेरा, सोबत बसलेल्या नवीन उल हककडे वळवतो. 'द मँगो गाय', असं म्हणत निकोलस पूरनने नवीनला नवं रुप दिलंय. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर निकोलस विराट कोहलीला टोमणा मारतोय की नवीनला डिवचतोय? असा सवाल नेटकरी विचारत आहेत.

पाहा Video 

 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सध्याच्या आयपीएल हंगामात प्लेऑफमध्ये (RCB Playoff Scenario) पोहोचण्याची आशा जिवंत ठेवण्यासाठी विराटची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. आजच्या सामन्यात हैदराबादविरुद्ध कोणत्याही किंमतीत विजय नोंदवणं आवश्यक आहे. त्यामुळे आरसीबीच्या खात्यात दोन अंक जमा होतील.

दरम्यान, रॉयल चॅलेजर्स बंगळुरूसाठी आगामी दोन सामने अतिमहत्त्वाचे आणि प्लेऑफचं तिकीट देणारे असतील. दोन्ही सामन्याचा विजय त्यांना थेट प्लेऑफमध्ये पोहचवू शकतो. तसेच दोन्हीपैकी जर एकच सामना जिंकता आला तर मुंबई आणि राजस्थान या दोन्ही संघाचा पराभव मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचवू शकतो. त्यामुळे आता विराट अँड कंपनी पूर्ण विश्वासाने मैदानात उतरेल.

Read More