Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

न्यूझीलंडचा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय

क्रिकेट विश्वाला  नवा विश्वविजेता मिळणार आहे.

न्यूझीलंडचा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय

लॉर्ड्स : टीम न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज वर्ल्ड कपची फायनल मॅच खेळली जाणार आहे. क्रिकेट विश्वाला आज नवा विश्वविजेता मिळणार आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड कपचा हा अंतिम सामना क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्ड्स या मैदानावर खेळला जाणार आहे.

वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने सलग दुसऱ्यांदा धडक मारली आहे. तर इंग्लंड तब्बल 27 वर्षांनंतर फायनलमध्ये पोहचली आहे. फायनल मॅच खेळण्याची इंग्लंडची ही चौथी वेळ आहे. वर्ल्ड कपचं यजमान पद इंग्लंडकडे असल्याने इंग्लंडला वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार समजलं जात आहे. 

साखळी फेरीत इंग्लंडने न्यूझीलंडचा 119 रनने पराभूत केले होते. वर्ल्ड कपमध्ये या दोनी टीम एकूण 9 सामने खेळले आहेत. यापैकी 4 मॅच इंग्लंडने जिंकल्या आहेत, तर 5 वेळा न्यूझीलंडचा विजय झाला आहे. या आकडेवारीनुसार दोन्ही टीम तुल्यबळ आहेत. त्यामुळे आजची फायनल कोण जिंकणार, याकडे क्रिकेट जगताचे लक्ष असणार आहे.

टीम इंग्लंड :  जेसन राय, जॉनी बेयरस्टो, जो रूट, इयन मोर्गन (कॅप्टन), बेन स्टोक्स, जॉस बटलर (विकेटकीपर), क्रिस वोक्स,  लियाम प्लंकेट, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वुड.     

टीम न्यूझीलंड : मार्टिन गप्टिल, हेनरी निकोल्स, केन विलियमसन (कॅप्टन), रॉस टेलर, जेम्स नीशाम, टॉम लॅथम (विकेटकीपर),कॉलिन डी ग्रँडहोम, मिशेल सेंटनेर, मॅट हेनरी, ट्रेंट बोल्ट आणि लॉकी फर्गयुसन 

Read More