Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आजची मॅच रद्द झाली अन् भारताच्या नावावर झाला अजब World Record!

भारतीय संघाने एक अजब रेकॉर्ड केला आहे, एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये....

 आजची मॅच रद्द झाली अन् भारताच्या नावावर झाला अजब World Record!

World Record : भारतीय संघाने क्रिकेटमध्ये अनेक वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत. यामध्ये काही रेकॉर्ड असेही आहेत की जे इतर कोणत्या संघाला मोडणंही शक्य नाही. आजही भारतीय संघाने एक रेकॉर्ड केला असून हा एक अजब रेकॉर्ड आहे. भारतीय संघाचे एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वाधिक 42 सामने रद्द झाले आहेत. (New Zealand was canceled and India got a world record latets marathi Sport News)

भारतीय संघाचा आज न्यूझीलंड विरूद्धचा तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. टीम इंडियाचा प्रत्येक 25 वा एकदिवसीय सामना कोणत्या ना कोणत्या कारणाने रद्द होतो. भारतीय संघाचे 42 सामने त्यानंतर न्यूझीलंड संघ दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचे 41 सामने रद्द झाले आहेत. 

आकडेवारी पाहिली तर भारत 42, न्यूझीलंड 41, श्रीलंका 38, ऑस्ट्रेलिया 34, इंग्लंड वेस्ट इंडिज 30, दक्षिण आफ्रिका 21, पाकिस्तान 20,  झिम्बाब्वेचे 12, बांगलादेश 3 आणि अफगाणिस्तानचे 3 सामने रद्द झाले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे श्रीलंकेविरूद्ध सर्वाधिक 11 सामने रद्द करण्यात आले.  इतर ऑस्ट्रेलिया 10, न्यूझीलंड 6, पाकिस्तान वेस्ट इंडिज 4, इंग्लंड दक्षिण आफ्रिका 3 आणि बांगलादेशविरूद्ध 1 असे भारताचे एकूण 42 सामने रद्द झाले.

महत्त्वाचं म्हणजे रद्द झालेले सामने ह फक्त पावसामुळेच नाहीतर इतर कारणांमुळे रद्द झाले आहेत. यामध्ये खराब खेळपट्टी, दगडफेक झाल्यामुळे रद्द करावा लागला होता. 1998 साली भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यामध्ये पाकिस्तानी प्रेक्षकांनी मैदानावर दगडफेक केली त्यामुळे सामना रद्द करावा लागला होता.

Read More