Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Gautam Gambhir: '...तर मरेपर्यंत साथ देईन', विराट कोहली सोबतच्या वादावर गौतम गंभीर स्पष्टच बोलला!

Gautam Gambhir On Virat Kohli: गौतम गंभीरने विराट कोहली आणि धोनीच्या (MS Dhoni) त्याच्यासोबत असलेल्या कथित वादावर भाष्य केलं आहे. नवीन-उल-हक (Naveen-ul-Haq) त्याच्या जागी योग्य होता. म्हणूनच मी त्याला पाठिंबा दिला, असं गंभीर म्हणतो.

Gautam Gambhir: '...तर मरेपर्यंत साथ देईन', विराट कोहली सोबतच्या वादावर गौतम गंभीर स्पष्टच बोलला!

Gautam Gambhir Virat Kohli ipl fight: आयपीएल 2023 चा हंगाम चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) नावावर राहिला. चेन्नई सुपर किंग्जने अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव केला आणि पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियनचं विजेतेपद पटकावलं. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये चर्चा सुरू होती ती विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादाची. लखनऊ आणि बेंगळुरू यांच्यातील सामन्यादरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार भांडण (Gambhir vs Kohli) झालं आणि परिणामी विराट कोहलीला आणि गौतम गंभीरला बीसीसीआयने (BCCI) मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावला. अशातच आता गौतम गंभीरने यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

काय म्हणाला गौतम गंभीर ?

गौतम गंभीरने विराट कोहली आणि धोनीच्या (MS Dhoni) त्याच्यासोबत असलेल्या कथित वादावर भाष्य केलं आहे. नवीन-उल-हक (Naveen-ul-Haq) त्याच्या जागी योग्य होता. म्हणूनच मी त्याला पाठिंबा दिला. इथे फक्त नवीनबद्दल नाही, जो बरोबर असेल, त्याला मी मरेपर्यंत साथ देईन. अनेकदा लोक मला विचारतात की तुझं कोहली आणि धोनीचं नातं कसं आहे? तेच मी म्हणतो माझं दोघांशी सारखंच नातं आहे. आमच्यात वाद झाला तर तो मैदानापर्यंतच राहतो. हा आमचा वैयक्तिक वाद नाही. त्याला मैदानात जिंकायचं आहे आणि मलाही, असं म्हणत गंभीरने खुलासा केला आहे.

आणखी वाचा - Gautam Gambhir: 'युवराज सिंहचं नाव का घेत नाही? एका व्यक्तीला...', गौतम गंभीरने चांगलंच सुनावलं!

क्रिकेटच्या मैदानावर भांडणं नवीन नाहीत. अनेकांची भांडणं होतात. त्यात मी सुद्धा आहे. माझी अनेक भांडणही झाली आहेत. मी असं म्हणणार नाही की माझं कधीही भांडण झालं नाही, परंतु दोन व्यक्तींमध्ये काय झालं हे सांगण्याची गरज नाही कारण क्रिकेटच्या मैदानावर अशा गोष्टी विसरल्या पाहिजेत. मला अनेकांनी टीआरपीसाठी मुलाखतीसाठी विचारलं पण दोघांमध्ये काय झाले हे उघड करण्याची गरज नाही, असंही गंभीर म्हणाला आहे.

नेमकं काय झालं होतं?

लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक आणि विराट कोहली यांच्यात सुरू असलेल्या सामन्यादरम्यान वाद झाला आणि सामना संपल्यानंतर वाद पुन्हा भडकला. सामन्यानंतरच्या हस्तांदोलनाच्या वेळी विराट आणि नवीन-उल-हक समोरासमोर आले आणि पुन्हा आक्रमकपणे बोलले. विराट आणि नवीन-उल-हक यांच्यातील भांडणात गौतम गंभीर देखील सामील होता ज्यामुळे मैदानावर वातावरण तापलं आणि BCCI ने विराट कोहली आणि गौतम गंभीर यांना IPL आचारसंहितेच्या कलम 2.21 चं उल्लंघन केल्याबद्दल फटकारलं आणि त्यांची मॅच फी जप्त केली होती.

Read More