Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'माझ्या कुटुंबाला त्रास झाला...', पबमध्ये पार्टीवर ग्लेन मॅक्सवेलने पहिल्यांदाच केला खुलासा!

AUS vs WI, Glenn Maxwell : परिस्थितीत बाहेर पडताना मी निराश झालो होतो. मी सोमवारी सरावात परत आलो होतो त्यामुळे मी खूप तयारीने समोर आलो, असं ग्लेन मॅक्सवेलने म्हटलं आहे.

'माझ्या कुटुंबाला त्रास झाला...', पबमध्ये पार्टीवर ग्लेन मॅक्सवेलने पहिल्यांदाच केला खुलासा!

Glenn Maxwell on Alcohol incident : वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेपूर्वी (AUS vs WI) ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला होता. ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याला पबमध्ये पार्टीदरम्यान मद्यपान (Alcohol incident) केल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं. ब्रेट लीच्या 'सिक्स अँड आउट' या बँडने सादर केलेल्या मैफिलीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली तेव्हा त्याला एक आठवडा सुट्टी होती. अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने मॅक्सवेलला रुग्णालयात दाखल केलं. त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती. अशातच आता या प्रकरणावर खुद्द ग्लेन मॅक्सवेल याने प्रतिक्रिया दिली आहे.  

काय म्हणाला Glenn Maxwell?

मला असं वाटतं की कदाचित माझ्या कुटुंबावर त्याचा परिणाम माझ्यापेक्षा थोडा जास्त झाला असेल. मला माहित होतं की माझ्याकडे त्या आठवड्याची सुट्टी होती. मी खूप लवकर बाहेर पडलो. परिस्थितीत बाहेर पडताना मी निराश झालो होतो. मी सोमवारी सरावात परत आलो होतो त्यामुळे मी खूप तयारीने समोर आलो. प्रशिक्षक, बेल्स, प्रत्येकजण खरोखरच उत्कृष्ट आहे. त्या घटनेनंतर माझ्यावर सहकाऱ्यांकडून मदत मिळाली. त्यांनी माझ्या कामगिरीवर परिणाम होऊ दिला नाही.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ग्लेन मॅक्सवेलचं वादळ पाहायला मिळालं. अवघ्या 55 चेंडूत 120 धावांचा पाऊस पाडला. या खेळीत त्याने 12 फोर आणि 8 सिक्स खेचत कॅरिबियन खेळाडूंच्या तोंडचं पाणी पळवलं. ग्लेन मॅक्सवेलची शतकीय खेळी ऑस्ट्रेलियासाठी तारणहार ठरली. ऑस्ट्रेलियाने सामना 35 धावांनी खिशात घातला. ग्लेन मॅक्सवेलचे आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यातील पाचवं शतक ठोकलं. त्याचबरोबर त्याने टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधित शतकांच्या रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. तर सुर्यकुमार यादव याला मागे टाकलंय.

दरम्यान, पबमध्ये झालेल्या प्रकारानंतर मॅक्सवेलला संघात घेणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. मात्र, ज्या मॅक्सवेलने एका पायावर उभा राहून डबल सेंच्यूरी ठोकली अन् ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकवला, अशा मॅक्सीला संघात घेण्याचा दबाव देखील ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डावर होता. मॅक्सवेलने सपोर्ट केल्याबद्दल ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचे आभार देखील मानले आहेत.

Read More