Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

कॅप्टन रोहित शर्मावर आयपीएलमध्ये लागणार बॅन?

5 वेळा ट्रॉफी मिळवली, 5 वेळा पराभव झाला आता रोहित शर्मावर या कारणासाठी लागणार बॅन?  

कॅप्टन रोहित शर्मावर आयपीएलमध्ये लागणार बॅन?

मुंबई : आयपीएलमध्ये 5 वेळा ट्रॉफी जिंकलेल्या रोहित शर्माच्या टीमची अवस्था अत्यंत वाईट आहे. कॅप्टन रोहित शर्मा पंधराव्या हंगामात अत्यंत वाईट फॉर्ममध्ये आहे. मुंबई टीमने आतापर्यंत 5 ही सामने गमावले आहेत. पंजाब विरुद्ध नुकत्याच झालेल्या सामन्यात 12 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. 

रोहित शर्माला यंदाच्या हंगामात दुहेरी दणका मिळाला आहे. आधीच टीमला लागलेलं पराभवाचं ग्रहण आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे बॅन लागण्याची भीती आहे. मुंबई टीमने दोन वेळा नियम मोडला आहे. त्यामुळे दोन वेळा दंड ठोठवण्यात आला. आता तिसऱ्यावेळी टीमवर बंदी लागू शकते. 

पहिल्यांदा दिल्ली विरुद्ध स्लो ओव्हरसाठी 12 लाख रुपये दंड भरावा लागला. त्यासोबत वॉर्निंग देण्यात आली. आता दुसऱ्यांदा पंजाब विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे दंड भरावा लागला आहे. 24 लाख रुपयांचा दंड रोहित शर्माला भरावा लागला आहे. 

पुन्हा एकदा रोहित शर्माने तीच चूक केली तर तिसऱ्यांदा 30 लाख रुपयांचा दंड त्यासोबत बंदी लागणार आहे. रोहित शर्मासाठी सर्वात मोठा धक्का असू शकतो. 

स्लो ओव्हर रेटच्या नियमानुसार जर एकदा ही चूक झाली तर वॉर्निंग आणि पहिला दंड 12 लाख रुपये भरावा लागतो. दुसऱ्यांदा नियम मोडल्यानंतर 24 लाख रुपये आणि प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूंवर दंड आकारला जातो. तिसऱ्यांदा नियम मोडला तर दंड आणि बंदी लागणार आहे. 

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामन्यातही मुंबई टीमला स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाख रुपयांचा दंड भरावा लागला होता. आता पंजाब विरुद्ध सामन्यात पुन्हा एकदा रोहितला स्लो ओव्हर रेटसाठी दंड भरावा लागला आहे. कर्णधार रोहित शर्माला 24 लाख रुपयांचा दंड भरावा लागला. 

इतर सदस्यांना 6 लाख रुपये दंज आणि मॅच फीमधून 25 टक्के फी कापून घेतली जाणार आहे. नियमाचं दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यानं ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. 

Read More