Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2024 : रोहित शर्मा पुन्हा होणार Mumbai Indians चा कॅप्टन, 'या' कारणामुळे हार्दिकचा होणार पत्ता कट?

Mumbai Indians : यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कॅप्टन केलं खरं पण, आगामी हंगामात तो खेळणार की नाही? अशी शंका निर्माण झाली आहे. अशातच रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा कॅप्टन म्हणून येणार का? असा सवाल विचारला जात आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा पुन्हा होणार Mumbai Indians चा कॅप्टन, 'या' कारणामुळे हार्दिकचा होणार पत्ता कट?

Hardik Pandya May Miss IPL 2024 : मोक्याच्या सामन्यात दुखापतग्रस्त होण्याची मोठी परंपरा टीम इंडियाला लागली आहे. वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या जखमी (Hardik Pandya Injury) झाला अन् त्याला वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलं. हार्दिक पांड्या जखमी असल्यामुळे त्याला साऊथ अफ्रिका आणि त्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेला मुकावं लागलं. मात्र, तो अफगाणिस्तानविरुद्धची टी-ट्वेंटी मालिका खेळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. अशातच आता हार्दिक पांड्या अफगाण मालिका तसेच आयपीएल देखील खेळणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पलटणचा कॅप्टन कोण?

मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला संघाबरोबर करारबद्ध केलं. एवढंच नाही तर संघात येताच त्याचं प्रमोशन देखील झालं होतं. हार्दिकला थेट मुंबई इंडियन्सचा कॅप्टन करण्यात आलं होतं. मात्र, आता जशी चर्चा होती तशी तसंच होताना दिसत आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे खेळणार नसल्याची शक्यता असल्याने आता मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी पुन्हा रोहित शर्माकडे येण्य़ाची शक्यता असेल. 

हार्दिकच्या फिटनेसवर अद्याप कोणतीही अपडेट नाही आणि आयपीएल संपण्यापूर्वी त्याच्या उपलब्धतेवरही प्रश्नचिन्ह आहे, अशी माहिती सुत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. दुखापतग्रस्त पांड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत पुनरागमन करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता आयपीएल 2024 पूर्वी हार्दिक पांड्या बरा होण्याची शक्यता खूपच कमी दिसत आहे. 

दरम्यान, हार्दिकच्या अँकलला दुखात झाल्याने तो टीमच्या बाहेर गेला होता. वर्ल्डकप 2023 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगलेल्या सामन्यात हार्दिकला दुखापत झाली होती. हार्दिकच्या अँकलमधील 1 लिगामेंट फाटल्याने त्याला पुन्हा खेळण्यासाठी कमबॅक करायला वेळ लागण्याची शक्यता आहे. 

मुंबई इंडियन्स : आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, हार्दिक पांड्या, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय सिंग, एन. तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, सूर्यकुमार यादव , टीम डेव्हिड , विष्णू विनोद.

नवे खेळाडू : जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.

Read More