Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

RR vs MI : मुंबई इंडियन्सची बस ट्रॅफिकमध्ये अडकली, मदतीला धावला सनीभाई अन्... पाहा Video

Mumbai Indians bus got stuck in traffic : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात जोरदार फाईट पहायला मिळणार आहे. पण सामना सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये काय झालं? पाहा त्याचाच व्हिडीओ

RR vs MI : मुंबई इंडियन्सची बस ट्रॅफिकमध्ये अडकली, मदतीला धावला सनीभाई अन्... पाहा Video

Rajasthan Royals vs Mumbai Indians : जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (RR vs MI) यांच्यात तगडा सामना पहायला मिळणार आहे. पहिले तीन सामने गमावल्यानंतर मुंबई संघाने पुन्हा एकदा वेग पकडलाय. गेल्या चारपैकी तीन सामन्यांत त्याने विजय मिळवला आहे. मात्र, टेबल टॉपर राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) विजयरथला लगाम घालणं त्याच्यासाठी सोपं जाणार नाही. त्यामुळे आता मुंबई इंडियन्ससाठी राजस्थान सारख्या तगड्या टीमचं आव्हान असणार आहे. मात्र, सामना सुरू होण्याआधीच मुंबई इंडियन्सची टीम संकटात नाही तर ट्रॅफिकमध्ये (Mumbai Indians bus got stuck in traffic) सापडली. नेमकं काय झालं? मुंबईला कुणी संकटातून वाट काढून दिली? पाहा

मुंबई इंडियन्सची टीम नेहमीप्रमाणे आपल्या सामन्यासाठी जात असताना त्यांना थोड्या अडचणीचा सामना करावा लागला. स्टेडियमकडे जात असताना मुंबई इंडियन्सच्या टीमची बस ट्रॅफिकमध्ये सापडली. त्यामुळे बसमध्ये बसलेले खेळाडू देखील चिंतेत दिसत होते. मात्र, त्याचवेळी रस्त्यावरून एका तरुणाने धाडस केलं अन् ट्रॅफिकमधून मुंबईच्या बसची सुटका केली. त्याचं नाव सनी असावं. त्याच्या टी शर्टवर सनी नाव लिहिलं होतं. सनीने केलेलं काम पाहून मुंबईच्या टीममधील खेळाडू देखील आनंदी झाले. त्यांनी टाळ्या वाजवत सनी भाईचं कौतूक केलं.

पाहा VIDEO

मुंबई इंडियन्सच्या अधिकृत अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मुंबईचा संघ सध्या जयपूरमध्ये असल्याने खेळाडू देखील धमाल करत आहेत. ग्राऊंडवर सराव करताना खेळाडूंची दिलजमाई दिसून आली. रोहित शर्मासोबत अनेक खेळाडू येऊन गप्पा मारताना दिसले. रोहितवरचं प्रेम पाहून राजस्थानने देखील एक व्हिडीओ शेअर केलाय. 

दरम्यान,  मुंबई आणि राजस्थान यांच्यात आतापर्यंत 29 सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये मुंबईने 15 विजयांसह आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, राजस्थानने 13 विजय मिळवले आहेत. दोघांमधील एक सामना अनिर्णित राहिला. परिणामी आजचा सामना कोण जिंकणार हे पाहवं लागेल.

मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेईंग 11: रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेविड, रोमारियो शेफर्ड, मोहम्मद नबी, गेराल्ड कोएत्जी, श्रेयस गोपाल, जसप्रित बुमराह. 

राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेईंग 11 : यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सैमसन (विकेटकीपर, कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिम्रोग हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अवेश खान, कुलदीप सेन, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल. 

Read More