Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

MI Vs SRH : प्लेऑफच्या दिशेने मुंबईला 'ग्रीन' सिग्नल; हैदराबादचा 8 विकेट्सने पराभव

MI Vs SRH : मुंबई इंडियन्सने हैदराबादवर विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. 

MI Vs SRH : प्लेऑफच्या दिशेने मुंबईला 'ग्रीन' सिग्नल; हैदराबादचा 8 विकेट्सने पराभव

MI Vs SRH : वानखेडेच्या मैदानावर आज सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात मुंबईच्या चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे मुंबई इंडियन्सने शेवटच्या साखळी सामन्यात हैदराबादवर विजय मिळवला आहे. या सामन्यात मुंबईने 8 विकेट्सने हैदराबादचा पराभव केला. यावेळी फलंदाज कॅमेरून ग्रीन या विजयाचा खरा शिल्पकार ठरला आहे. 

कॅमरून ग्रीनचं तुफानी शतक

वानखेडेवर 201 त्या टार्गेटचा पाठलाग करताना ओपनर इशान किशनला मोठी खेळी करता आली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या टीकेला कर्णधार रोहित शर्माने मात्र चोख प्रत्युत्तर दिलं आहे. इशान किशन बाद झाल्यानंतर रोहित शर्माने कमान सांभाळली. आक्रमक फलंदाजी करताना त्याने 37 बॉल्समध्ये 56 रन्सची खेळी केली. 

यावेळी रोहितला क्रिझवर उत्तम साथ दिली ती कॅमेरून ग्रीनने. मुंबईकडून चमकदार कामगिरी करताना कॅमेरून ग्रीनने शतक झळकावलं. त्याने 47 बॉल्समध्ये नाबाद रन्स केले. त्याच्या या खेळीत 8 सिक्स आणि 8 फोर्सचा समावेश होता. तर सूर्यकुमारने 25 रन्स केले. 

मुंबईच्या गोलंदाजांनी आजंही खाल्ला मार

सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 201 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 200 रन्स केले. हैदराबादच्या ओपनिंग जोडीने मुंबईच्या गोलंदाजांना चांगलंच चोपलं.

मयंक अग्रवाल आणि विव्रत शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 140 रन्सची पार्टनरशिप केली. विवंत शर्माने 47 बॉल्समध्ये 69 रन्स केले. यावेळी त्याने 9 फोर आणि 2 सिक्स लगावेल. तर मयंक अग्रवालने 44 बॉल्समध्ये 82 रन्स केले. मात्र या दोन खेळाडूंनंतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. मुंबईकडून आकाश मधवालने 4 विकेट्स काढले.

Read More