Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

वर्ल्ड कपमध्ये असलेला मयंक वनडे टीममध्ये का नाही? निवड समितीचं उत्तर

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रविवारी टीम इंडियाची निवड करण्यात आली.

वर्ल्ड कपमध्ये असलेला मयंक वनडे टीममध्ये का नाही? निवड समितीचं उत्तर

मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रविवारी टीम इंडियाची निवड करण्यात आली. वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी मोठे बदल केले जातील, असं बोललं जात होतं. पण निवड समितीने मात्र टीममध्ये मोठे बदल केले नाहीत. पण निवड समिती आणि टीम प्रशासनाने घेतलेल्या काही निर्णयांवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

वर्ल्ड कप सुरू असताना विजय शंकरला दुखापत झाल्यामुळे मयंक अग्रवालची टीममध्ये निवड झाली. पण वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी मयंक अग्रवालला संधी देण्यात आली नाही. वर्ल्ड कपमध्ये मयंक अग्रवालला एकाही मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मग संधी न देता मयंक अग्रवालला का डावलण्यात आलं? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. वर्ल्ड कपमध्ये टीम प्रशासनाने मागितल्यामुळे आम्ही मयंक अग्रवालला संधी दिली, असं एमएसके प्रसाद म्हणाले.

'सीरिज सुरु असताना मी पत्रकार परिषद घेत नाही, त्यामुळे अनेक अफवा पसरल्या. जेव्हा धवन दुखापतग्रस्त झाला तेव्हा आमच्याकडे राहुल हा ओपनिंगसाठी पर्याय होता. टीममध्ये डावखुरा बॅट्समन नव्हता म्हणून टीम प्रशासनाने डावखुऱ्या बॅट्समनची मागणी केली, तेव्हा आमच्याकडे पंतशिवाय कोणताही पर्याय नव्हता. ओपनिंग बॅट्समनऐवजी मधल्या फळीतल्या बॅट्समनला आणि विजय शंकरच्याऐवजी ओपनिंग बॅट्समनची निवड का झाली? याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं,' अशी प्रतिक्रिया एमसके प्रसाद यांनी दिली.

'विजय शंकरला दुखापत झाली तेव्हा, केएल राहुलला बाऊंड्रीवर फिल्डिंग करताना पाठीची दुखापत झाली. राहुलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यावेळी आमच्याकडे राहुलला पर्याय म्हणून ओपनिंग बॅट्समनची मागणी टीम प्रशासनाने केली, तेव्हा आम्ही मयंक अग्रवालला संधी दिली,' असं एमएसके प्रसाद म्हणाले. 

Read More