Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आयपीएल २०१८मध्ये धोनी नव्या अवतारात दिसणार!

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.

आयपीएल २०१८मध्ये धोनी नव्या अवतारात दिसणार!

मुंबई : आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जमध्ये यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना होईल. आयपीएलआधी अनेक टीमनी खेळाडूंच्या शिबीराला सुरुवात केली आहे. या शिबिरामध्ये खेळाडू जोरदार सराव करताना पाहायला मिळत आहेत. काही जण त्यांच्या टीमची जर्सी आणि थीम साँग लॉन्च करतायत. पण चेन्नई सुपरकिंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी वेगळीच तयारी करतोय. खेळाची नाही तर वेगळ्या लूकसाठी धोनीची तयारी सुरु आहे.

आयपीएलच्या नव्या मोसमात धोनी नव्या हेअरस्टाईलमध्ये दिसणार आहे. हेअर स्टाईल करण्यासाठी धोनी हेअर स्टायलिस्ट सपना मोती भवनानीकडे गेला होता. काही दिवसांपूर्वी धोनी त्याच्या मोठ्या केसांच्या जुन्या लूकमध्ये दिसला होता. एका चॉकलेटच्या जाहिरातीसाठी धोनी या लूकमध्ये होता.

दोन वर्षाच्या बंदीनंतर चेन्नई सुपरकिंग्ज आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. त्यामुळे या आयपीएलमध्ये धोनीचा वेगळा लूक पाहायला मिळेल. यावेळी धोनीच्या केसांचा रंग वेगळा असू शकतो, असे संकेत हेअर स्टायलिस्ट सपना भवनानीनं दिले आहेत. सपनानं धोनीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. कॅप्टनच्या केसांचा रंग पिवळा केला पाहिजे का? असा सवाल सपनानं ट्विटरवर विचारला आहे. 

 

Read More