Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

धोनीने बदलला लुक, नव्या हेअरकटमध्ये दिसतोय आणखी तरूण

. या लुकमुळे ३७ वर्षांचा धोनी आणखी तरुण दिसतो. 

धोनीने बदलला लुक, नव्या हेअरकटमध्ये दिसतोय आणखी तरूण

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी मैदानात जेवढा कूल दिसतो तसाच वैयक्तिक आयुष्यातही आहे. कधी तो आपल्या फॅमिलीसोबत तर कधी मित्रांसोबत मज्जा मस्ती करताना दिसतो. आपल्या वेगवेगळ्या मूडचे फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. करिअरच्या सुरूवातीच्या काळात धुवांधार बॅटींगसोबत तो लांब केसांमुळे चर्चेत असायचा. आतापर्यंत त्याने आपल्या बॅटींग, किंपिग स्टाईलसोबतच केसांच्या स्टाईलमध्येही बदल केला. कधी लांब, कधी लहान तर काही वेगळाच केसांचा लुक पाहायला मिळतो. १४ वर्षाच्या करिअरमध्ये त्याने वेगवेगळे लुक पाहायला मिळाले. यावेळेसही त्याचा नवा लुक समोर आलाय. या लुकमुळे ३७ वर्षांचा धोनी आणखी तरुण दिसतो. त्याचा चाहत्यांनाही हा नवा लुक पसंतीस पडतोय.

नवा हेअरकट

धोनीचा हा नवा हेअरकट म्हणजे V-HAWK आहे. या नव्या हेअरकटमध्ये धोनीचे तेस लांब आणि पाठीमागून V आकाराचे आहेत. धोनीचा नवा हेअरकट त्याची आवडती हेअर स्टाईलिस्ट सपना भवनानीने दिलायं.

पांड्याने दिला स्पेशल कट 

याआधी धोनीचा टीममेट हार्दीक पांड्याने धोनीच्या ३७ व्या वाढदिवशी एक हेअरकट दिला होता. पांड्याने सोशल मीडिया तो फोटो शेअर करत स्पेशल डे साठी खास हेअरकट..हे माझ्याकडून माहीसाठी बर्थ डे गिफ्ट' असे लिहिले.

Read More