Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

MS Dhoni मुळे या खेळाडूंच्या क्रिकेटमधील करियरला लागलं ग्रहण?

कॅप्टन कूल माहीमुळे खरंच या क्रिकेटरच्या करियरला ग्रहण लागलं असेल का? तुम्हाला काय वाटतं?

MS Dhoni मुळे या खेळाडूंच्या क्रिकेटमधील करियरला लागलं ग्रहण?

मुंबई: कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणाऱ्या धोनीनं जसं क्रिकेटमध्ये खेळाडूंचा भविष्य घडवलं तसंच त्याच्यामुळे काही खेळाडूंचं नुकसान झाल्याचंही म्हटलं जातं. टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून धोनीकडे पाहिलं जातं. टीम इंडियात असेकाही खेळाडू आहेत ज्यांची कारकीर्द केवळ धोनीमुळे घडली आणि आज ते जागतिक क्रिकेटचे मोठे स्टार खेळाडू म्हणून नावाला आहे. 

रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन, सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि अशी अनेक मोठी नावे आहेत ज्यांची कारकीर्द धोनीने घडवली. पण आज अशा खेळाडूंबद्दल जाणून घेऊया ज्यांची कारकीर्द धोनीमुळे संपली असा दावा केला जातो. आज ते खेळाडू काय करतात हे देखील जाणून घेऊया.

दिनेश कार्तिकने वयाच्या 17 व्या वर्षी फर्स्ट क्लास क्रिकेटमधून आपल्या करियरची सुरुवात केली. 2004 मध्ये विकेटकीपरच्या रुपात भारतीय टीममध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. पण जेव्हा धोनी टीम इंडियामध्ये आला त्यानंतर टीम इंडियामध्ये दिनेश कार्तिकचं स्थान डळमळीत झालं. आज दिनेश कार्तिक कमेंटेटर म्हणून काम करत आहे. 

कार्तिकप्रमाणेच नमन ओझाची कारकीर्दही धोनीमुळे संपली. धोनीने पदार्पण केले त्याच वेळी ओझा संघात स्थान मिळवणार होतं पण नंतर माहीच्या येण्यामुळे त्याला संघात स्थान मिळू शकलं नाही. श्रीलंकेविरुद्ध, त्याला 2010 मध्ये पहिल्यांदा भारताविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली.  

नमन ओझाने 2015 मध्ये, त्याने स्वतःची पहिली कसोटी श्रीलंकेविरुद्ध खेळली. पण धोनीमुळे त्याला जास्त संधी मिळाल्या नाहीत आणि तो फक्त आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटपुरता मर्यादित राहिला. बंगालकडून खेळाणारे दीपादास गुप्ता विकेटकीपर होते. मात्र धोनीमुळे त्यांना टीम इंडियामध्ये स्थान कमी मिळालं आणि त्यानंतर त्यांनी कमेंटेटर म्हणून काम सुरू केलं आहे.  

पार्थिव पटेल विकेटकीपर म्हणून टीम इंडियात एन्ट्री केली मात्र माहीमुळे त्याचं करियर संपुष्टात आल्याचं सांगितलं जात आहे. त्याला जास्त संधी देण्यात आली नाही. 

Read More