Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

विकेट घेताच मोहम्मद सिराजचं रोनाल्डो स्टाईलनं सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

मोहम्मद सिराजचं 'Siuu' सेलिब्रेशन...याचा अर्थ माहीत आहे का? पाहा व्हिडीओ

विकेट घेताच मोहम्मद सिराजचं रोनाल्डो स्टाईलनं सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

मुंबई :  पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात बंगळुरू संघाला पराभवाचा सामना करावा लागला. बंगळुरू संघाकडून पंजाबने विजय खेचून आणला. 200 अधिक धावांचं लक्ष्य ठेवूनही बंगळुरूला पराभवच स्वीकारावा लागला. या सामन्यात बंगळुरूचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज चर्चेचा विषय ठरला. 

सिराजने सामन्यात 2 विकेट्स घेतल्या. याचा आनंद साजरा करण्यासाठी रोनाल्डोची स्टाईल कॉपी केली. त्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. क्रिकेटच्या मैदानात मोहम्मद सिराज रोनाल्डो बनला. 

सिराजने 4 ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्या. याचा आनंद साजरा करत रोनाल्डो स्टाईलनं सेलिब्रेशन केलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याला Siuu सेलिब्रेश असंही म्हटलं जातं. 

काय आहे Siuu सेलिब्रेशन?

'Siuu' हा एक स्पॅनिश शब्द आहे. याचा अर्थ हो असा होतो. क्रिस्टियानो रोनाल्डोचं ट्रेडमार्क असलेलं Siuu सेलिब्रेशन क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळालं. त्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. रोनाल्डो गोल केल्यानंतर 360 डिग्रीमध्ये गोल फिरून त्याचं सेलिब्रेशन करतो. तीच स्टाईल सिराजनं कॉपी केल्याचं पाहायला मिळालं.

सिराजने बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात नाही तर यापूर्वी अनेकदा क्रिकेटच्या मैदानात रोनाल्डोची ही स्टाईल कॉपी केल्याचं पाहायला मिळालं आहे. आयपीएलमध्ये सिराजचं हे सेलिब्रेशन चर्चाचा विषय ठरला आहे. 

Read More