Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

विराट आऊट होताच ‘या’ खेळाडूने केली होती टीम इंडियाच्या पराभवाची भविष्यवाणी!

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सेंचुरियन टेस्टचा शेवटचा दिवस आहे आणि टीम इंडिया अडचणीत दिसत आहे. केपटाऊनमध्ये पहिली टेस्ट ७२ रन्सने विजयी मिळवणारा दक्षिण आफ्रिका संघ तीन टेस्टच्या सीरिजमध्ये २-० ने आघाडी घेण्याच्या मार्गावर आहे.

विराट आऊट होताच ‘या’ खेळाडूने केली होती टीम इंडियाच्या पराभवाची भविष्यवाणी!

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सेंचुरियन टेस्टचा शेवटचा दिवस आहे आणि टीम इंडिया अडचणीत दिसत आहे. केपटाऊनमध्ये पहिली टेस्ट ७२ रन्सने विजयी मिळवणारा दक्षिण आफ्रिका संघ तीन टेस्टच्या सीरिजमध्ये २-० ने आघाडी घेण्याच्या मार्गावर आहे.

टीम इंडियाच्या अडचणी

या सीरिजमध्ये टीम इंडिया १-१ अशी बरोबरी करण्याची शक्यता कमीच दिसत आहे. लुंगी एनगिडी आणि कागिसो रबाडा यांच्या धारदार गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेने २८७ रनच्या टार्गेटचा पाठलाग करत असलेल्या टीम इंडियाचा स्कोर चौथ्या दिवशी दुस-या इनिंगमध्ये तीन विकेटवर ३५ रन्स असा रोखला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत चेतेश्वर पुजारा ११ आणि पार्थिव पटेल पाच रनवर खेळत होता.

 विराटची विकेट

विजयासाठी २८७ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करणा-या टीम इंडियाची सुरूवात चांगली झाली नाही आणि त्यांनी १६ रन्समध्ये दोन सलामी फलंदाज मुरली विजय(०९) आणि लोकेश राहुल(०४) च्या विकेट गमावल्या. लुंगी एनगिडीच्या दोन विकेट्समध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याचीही विकेट आहे. विराट केवळ ५ रन्सच्या खाजगी स्कोरवर आऊट झाला. 

मोहम्मद कैफचं ट्विट

विराट कोहली आऊट झाल्याने टीम इंडियाच्या आशांवर पाणी फेरलं गेलं. टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने तर विराट आऊट झाल्यावर टीम इंडियाच्या पराभव होणार अशी भविष्यवाणीच केली. 


त्याआधी दक्षिण आफ्रिकेने एबी डिविलियर्स(८०), डीन एल्गर(६१) आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस(४८)यांच्या खेळीच्या भरोशावर दुस-या इनिंगमध्ये २५८ रन्स केले आणि टीम इंडियाला २८७ रन्सचं टार्गेट दिलं. डिविलियर्स आणि एल्गरने तिस-या विकेटसाठी १४१ रन्स करून टीमला मजबूत स्कोरमध्ये पोहचवलं. डु प्लेसिसने वॉर्नन फिलेंडर(२६)सोबत सहाव्या विकेटसाठी ४६ आणि कागिसो रबाडा(०४) सोबत आठव्या विकेटसाठी ३० रन्सची भागीदारी केली.

Read More