Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

मेरी कोमला सुवर्ण पदक, जोसीवर ४-१ सहज मात

पाच वेळा वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप पटकावणारी भारताची मुष्टीयोद्धा एम. सी. मेरी कोमने इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत सोनेरी कामगिरी केलेय. मेरी कोमने ४८ किलो वजनी गटात फिलिफिन्सच्या जोसी गॅबुकोवर ४-१ अशी सहज मात करत सुवर्ण पदक जिंकले.

मेरी कोमला सुवर्ण पदक, जोसीवर ४-१ सहज मात

नवी दिल्ली : पाच वेळा वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप पटकावणारी भारताची मुष्टीयोद्धा एम. सी. मेरी कोमने इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत सोनेरी कामगिरी केलेय. मेरी कोमने ४८ किलो वजनी गटात फिलिफिन्सच्या जोसी गॅबुकोवर ४-१ अशी सहज मात करत सुवर्ण पदक जिंकले.

मेरीने अंतिम फेरीत प्रवेश करताना मंगोलियाची खेळाडू अल्तानसेटसेग लुटसैखन हिचा परभव केला. अंतिम फेरीत तिची लढत फिलिपिन्सची जोसी गबुको हिच्याशी झाली.  यंदाच्या स्पर्धेत पहिले सुवर्ण पटकावण्याचा मान विलाओ बसुमतरीने पटकावला. तिने ६४ किलो गटामध्ये थायलंडच्या सुदापोर्न सिसोन्दीवर चुरशीच्या लढतीमध्ये ३-२ अशी मात केली. यापूर्वी, २०१५ मध्ये तिने सर्बियामध्ये झालेल्या नेशन्स चषक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.

आसामच्याच लोवलिना बोगरेहेनने वेल्टरवेट (६९ किलो) गटात वर्चस्व राखले. तिने भारताच्याच पूजाचा पराभव केला. मेरी कोमसह विलाओ बसुमतरी, लोवलिना बोगरेहेनने पहिले स्थान मिळवले तरी एल. सरिता देवीला (६० किलो) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 

उपांत्य फेरीत ४८ किलो वजनी गटात खेळणाऱ्या मेरी कोमने सुरूवातीचे दोन राऊंड अगदी सहज आपल्या नावावर करून घेतले. मात्र नंतर काही काळ ती अडखळत खेळत होती. शेवटच्या दोन राऊंडमध्ये पुन्हा मेरी कोमने जगजेतेपदाला साजेसा खेळ करत आक्रमक भूमिका घेतली. तिने शेवटचे दोन्ही राऊंड जिंकत फायनलमध्ये जागा पटकावली आहे.

दरम्यान, मुष्टीयोद्धा शिवा थापा आणि मनोज कुमार या दोघांचाही उपांत्य फेरीत पराभव झाल्याने त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

Read More