Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Mankading Controversyत पाकिस्तानची उडी, दीप्ती शर्माला म्हणाला ''चीटर''

दीप्ती शर्माला ''चीटर'' म्हणणारा हा पाकिस्तानी खेळाडू आहे तरी कोण? 

Mankading Controversyत पाकिस्तानची उडी, दीप्ती शर्माला म्हणाला ''चीटर''

इंग्लंड : इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात भारतीय महिला खेळाडू दीप्ती शर्माने (Deepti Sharma) मंकडिंग पद्धतीने चार्ली डीनला (Charlotte Dean) नॉन-स्ट्रायकर असताना रनआऊट करत सामन्यात विजय मिळवला होता. या रनआऊटनंतर मोठा वाद रंगला होता. अनेक माजी दिग्गज खेळाडू यावर प्रतिक्रिया देत होते. त्यात आता पाकिस्तानने या वादात उडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय चाहेत चांगलेच आक्रमक झाले आहेत. 

काय म्हणाला पाकिस्तानचा माजी खेळाडू?
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर मोहम्मद आसिफने या वादात उडी घेतली आहे. मोहम्मद आसिफने सोशल मीडियावर दीप्ती शर्माला चीटर म्हटले आहे.यासह त्याने दीप्तीवर आरोप केले. 
आसिफ म्हणाला की, आम्ही स्पष्टपणे पाहू शकतो की, चेंडू फेकण्याचा तिचा कोणताही हेतू नव्हता, ती फक्त नॉन-स्ट्रायकरवर उभ्या असलेल्या फलंदाजाकडे पाहत होती, जेणेकरून ती फसवू शकेल. हे पूर्णपणे अन्यायकारक आहे. 

नेटकऱ्यांनी घेतली शाळा
आसिफच्या या ट्विटनंतर तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. तसेच नेटकऱ्यांनी आसिफच्या जून्या आठवणी बाहेर काढत त्याला 'फिक्सर' म्हणून चिडवले.
 
आसिफच्या या ट्विटनंतर एका यूजरने लिहिले की, ज्या व्यक्तीने पैशासाठी आपल्या देशाची फसवणूक केली, तो आता एका सज्जन व्यक्तीबद्दल बोलत आहे. त्याचवेळी दुसऱ्या य़ुझरने लिहले की फिक्सर गेम स्पिरिटबद्दल बोलत आहे. तर एकाने सांगितले की होय, मॅच फिक्सिंग हा खेळाचा खरा आत्मा आहे. दरम्यान आसिफने दीप्तीच्या या रनआऊटला चीटर नेटकऱ्यांनी त्याला जागा दाखवली आहे.

MCC चा निर्णय काय?
मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC) च्या  क्रिकेटच्या कायद्याच्या संरक्षकांनी रविवारी भारतीय खेळाडू दीप्ती शर्माने गोलंदाजीच्या शेवटी इंग्लंडच्या चार्ली डिनला (Charlie Dean) केलेल्या रनआऊटवर मान्यतेची मोहर उमटवली होती. त्यामुळे हा वाद आता इथेच शमत आहे.  

Read More