Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

IND vs NZ LIVE Updates: कोहलीने केला सूर्याचा गेम! डेब्यू सामन्यात सूर्यकुमार 2 धावा करत रनआऊट

World Cup IND vs NZ Live Score: आज भारत आणि न्यूझीलंडचे संघ आमने-सामने असून स्पर्धेमधील 21 वा सामना हिमाचलमधील धर्मशाला येथील मैदानात खेळवला जात आहे. याच सामन्यातील क्षणोक्षणाच्या सर्व अपडेट्स या ठिकाणी तुम्ही पाहू शकता.

IND vs NZ LIVE Updates: कोहलीने केला सूर्याचा गेम! डेब्यू सामन्यात सूर्यकुमार 2 धावा करत रनआऊट
LIVE Blog

World Cup IND vs NZ Live Score: वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील 21 वा सामना आज भारत आणि न्यूझीलंडदरम्यान खेळवला जात आहे. पॉइण्ट्स टेबलमधील अव्वल 2 संघांचा हा सामना हिमाचलमधील धर्मशालाच्या मैदानात खेळवला जात असून दोन्ही संघांनी स्पर्धेतील आतापर्यंतचे आपआपले 4 ही सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे या सामन्यामध्ये बाजी मारुन कोण अव्वल स्थानी कायम राहणार हे आज निश्चित होणार आहे. याच सामन्यासंदर्भातील लाइव्ह अपडेट्स आपण या ठिकाणी पाहू शकता...

22 October 2023
21:08 PM

एक धाव घेण्याच्या नादात सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांच्यात चुकामूक झाली. विराटच्या एका चुकीमुळे सूर्यकुमार रनआऊट झाला. 

21:02 PM

टीम इंडियाचा किंग कोहलीने 60 बॉलमध्ये संयमी खेळी करत अर्धशतक पूर्ण केलंय. सूर्यकुमार यादव त्याला साथ देण्यासाठी मैदानात आहे. टीम इंडियाला विजयासाठी 100 बॉलमध्ये 86 धावाची गरज आहे.

20:12 PM

श्रेयस अय्यर 22 धावा करून बाद झालाय. टीम इंडिया 128-3 

19:41 PM

15.4 ओव्हरमध्ये टीम इंडियाने 100 धावा पूर्ण केल्या आहेत. रोहित आणि शुभमन दोन्ही सलामीवीर आऊट झाल्यानंतर विराट आणि श्रेयस अय्यर मैदानात आहेत. अशातच आता सामना थांबवण्यात आला आहे. त्याला कारण धर्मशालाच्या मैदानावर तयार झालेलं धुकं... धुकं जास्त असल्याने सामना थांबवण्यात आला आहे.

19:29 PM

शुभमन गिल आऊट

लॉकी फर्ग्युसनचा टीम इंडियावर घाव केला आहे. त्याने प्रथम रोहित शर्माला बाद केलं. तर त्यानंतर आता शुभमन गिल देखील बाद झालाय. शुभमन गिल 26 धावा करून बाद झाला.

19:17 PM

रोहित शर्मा बाद

टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा 46 धावा करून बाद झालाय. लॉकी फर्ग्युसनने त्याच्या पहिल्याच ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर विकेट काढली.रोहितने 4 फोर आणि 4 सिक्स मारले.

19:06 PM

टीम इंडियाचं अर्धशतक पूर्ण

भारतीय संघाने 7.4 ओव्हरमध्ये 52 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा  28 धावांवर खेळतोय. तर शुभमन गिल 24 धावांवर आहे.

18:40 PM

सलामीजोडी मैदानात

न्यूझीलंडने दिलेलं 274 धावांचं आव्हान पार करण्यासाठी टीम इंडियाची सलामी जोडी म्हणजेच रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात आले आहेत.

18:02 PM

टीम इंडियासमोर 274 धावांचं आव्हान

धर्मशालाच्या एचपीसीए स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. पहिल्या 10 ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शमीने फासे आवळले अन् न्यूझीलंडला धावगती रोखली. दोन्ही सलामीवीर तुंबत परतल्यानंतर  रचिन रवींद्र व डॅरिल मिचेल यांनी हात मोकळे केले आणि संयमी धावा कुटल्या. 178 वर टीम इंडियाला तिसरी विकेट मिळाली. त्यानंतर डॅरिल मिचेल याने 100 बॉलमध्ये शतक ठोकलं. मात्र, टॉम लिथमच्या विकेटनंतर न्यूझीलंडचा डाव ढासळला. त्यानंतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.  डॅरिल मिचेलने अखेरीस आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्याने 130 धावा केल्या. विराटने बॉन्ड्रीवर एक अप्रतिम कॅच घेत न्यूझीलंडचा खेळ संपवला न्यूझीलंडचा संघ 50 ओव्हरमध्ये 273 धावा करत ऑलआऊट झाला. भारताक़डून मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेतल्या. पहिल्याच सामन्यात शमीने पंच लगावला आहे.

17:48 PM

न्यूझीलंडला 300 च्या आत रोखण्याचा प्रयत्न टीम इंडिया करत आहे. अखेरच्या षटकात मोहम्मद शमीने सॅटनरच्या दांड्या उडवल्या 

17:34 PM

न्यूझीलंडला पाचवा धक्का!!

न्यूझीलंडच्या डावाचा पाचवा विकेट गेलाय. ग्लेन फिलिप्स 26 बॉलमध्ये 23 धावा करत बाद झाला. कुलदीपच्या बॉलवर रोहित शर्माने कॅच घेतला. 

17:14 PM

स्टार फलंदाज डॅरिल मिशेलचं शतक पूर्ण झालं असून आता न्यूझीलंडची 300 च्या दिशेने वाटचाल सुरू झालीये. डॅरिल मिशेलने 100 बॉलमध्ये आपलं शतक पूर्ण केलं.

16:56 PM

कुपदीप यादवने न्यूझीलंडला चौथा धक्का दिला आहे. टॉम लेथम 5 धावा करून बाद झाला.

NZ 206/4 (37.2)

16:23 PM

रचिन रविंद्र आणि डॅरेल मिचेलची न्यूझीलंडसाठी टिचून फलंदाजी; दोघांनीही झळकावली अर्धशतकं

न्यूझीलंडचे मधल्या फळीतील रचिन रविंद्र आणि डॅरेल मिचेल या दोघांनीही अर्धशतकं झळकावली असून संघाचं स्कोअरकार्ड 30 ओव्हरमध्ये 150 हून अधिकपर्यंत नेलं आहे. भारतीय गोलंदाजांना ही पार्टनरशीप तोडण्यात यश आलेलं नाही.

15:28 PM

2 विकेट्स गेल्यानंतर न्यूझीलंडचा डाव स्थिरावला! रचिन आणि डॅरेल मिचेलची जोडी जमली

विल याँग आणि डेव्हॉन कॉनव्हे हे सलामीवर स्वस्तात तंबूत परतल्यानंतर रचिन रविंद्र आणि डॅरेल मिचेल यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला आहे. 19 ओव्हरमध्ये न्यूझीलंडची धावसंख्या 90 वर पोहचली आहे. 

14:43 PM

मोहम्मद शामीने वर्ल्ड कपमधील पहिल्याच बॉलवर घेतली विकेट

शार्दूल ठाकुरच्या जागी भारतीय संघात संधी मिळालेल्या मोहम्मद शामीने संधीचं सोनं केलं आहे. शामीने वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी करताना पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आहे. शामीने न्यूझीलंडचा सलामीवर विल याँगला बोल्ड केलं. सामन्यातील 9 व्या ओव्हरला न्यूझीलंडची धावसंख्या 19 वर असताना भारताला दुसरं यश मिळालं.

14:24 PM

भारताला पहिलं यश! मोहम्मद सिराजने डेव्हॉन कॉनव्हेला केलं बाद

सामन्यातील चौथ्याच ओव्हरमध्ये भारताला पहिली विकेट मिळाली आहे. मोहम्मद सिराजने टाकलेल्या चेंडूवर डेव्हॉन कॉनव्हेने चौकार माराण्याचा प्रयत्न केला. मात्र श्रेयस अय्यरने अप्रतिम झेल घेत कॉनव्हेला तंबूत पाठवलं. संघाची धावसंख्या 9 वर असताना 9 चेंडू खेळून भोपळाही न फोडता डेव्हॉन कॉनव्हे बाद झाला.

13:57 PM

न्यूझीलंडविरुद्ध अशी आहे भारताची Playing XI! सूर्याची संघात एन्ट्री तर शार्दुलच्या जागी...

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्माने संघामध्ये 2 प्रमुख बदल करण्यात आल्याचं सांगितलं आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात पहिल्यांदाच 2 नव्या खेळाडूंचा या स्पर्धेतील प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. सूर्यकुमार यादवला संघात स्थान देण्यात आलं आहे. तर शार्दुल ठाकूरला संघातून डच्चू देण्यात आला आहे. शार्दुलच्या जागी कोणाला संघात स्थान मिळालं आहे पाहा येथे क्लिक करुन...

13:34 PM

भारताने टॉस जिंकला! प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

भारतीय कर्णधार रोहित शर्माने धरमशाला येथे खेळवल्या जात असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील टॉस जिंकला आहे. भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

13:15 PM

आमने-सामने रेकॉर्ड काय सांगतो?

भारत आणि न्यूझीलंडने एकमेकांविरोधात एकूण 116 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी भारताने 58 सामने जिंकले असून 50 सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. यापैकी 7 सामन्यांचा कोणताही निकाल लागला नाही तर 1 सामना अनिर्णित राहिला.

 

12:27 PM

6 संघांनी 17 सामने गमावले; World Cup 2023 Semi Final मधील 2 संघ निश्चित

भारताने आजचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकला तर पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थान गाठता येईल. या स्पर्धेमध्ये 10 संघ खेळत असून अव्वल 4 संघांना उपांत्यफेरीचं तिकीट मिळणार आहे. सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी असलेल्या 6 संघांनी आपले 17 सामने गमावले आहेत. त्यामुळे भारताचा उपांत्यफेरीतील प्रवेश अधिक सुखकर झाला आहे. नेमकं हे गणित कसं आहे पाहा येथे क्लिक करुन...

10:08 AM

कुठे पाहता येणार सामना?

भारत आणि न्यूझीलंडमधील धरमशाला येथे दुपारी 2 वाजता सुरु होणारा सामना स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर लाइव्ह पाहता येणार नाही. तसेच डिस्ने+हॉटस्टार अॅपवरुन आणि वेबसाईटवरुन हा सामना पाहता येणार आहे.

10:06 AM

किती वाजता सुरु होणार सामना?

भारत आणि न्यूझीलंडमधील धरमशाला येथील मैदानातील वर्ल्ड कप स्पर्धेमधील 21 वा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरु होईल. दीड वाजता नाणेफेक होईल. भारताने मागील 20 वर्षांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही.

08:55 AM

Ind vs NZ सामन्याआधी Points Table नं वाढवलं टेन्शन! दक्षिण आफ्रिकेचं Net Run Rate धडकी भरवणारं

वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेतील 20 व्या सामन्यातील निकालाने पॉइण्ट्स टेबलमध्ये मोठा उलथापालथ झाली आहे. मुंबईमधील वानखेडे मैदानात शनिवारी खेळवण्यात आलेल्या दक्षिण अफ्रिका विरुद्ध इंग्लंड सामन्यात नेदरलॅण्डकडून पराभूत झालेल्या दक्षिण आफ्रिकेने विद्यमान विजेत्या संघाचा धुव्वा उडवल्याने भारत आणि न्यूझीलंडचंही टेन्शन वाढलं आहे. येथे क्लिक करुन पाहा 20 व्या सामन्यानंतरचं पॉइण्ट्स टेबल

08:53 AM

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला आणखी एक धक्का, मॅचविनर खेळाडू जखमी

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज होत असतानाच टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्यानंतर आणखीन एक मॅचविनर खेळाडू जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. नेमकं घडलंय काय आणि याचा काय परिणाम संघावर होणार वाचा येथे क्लिक करुन...

08:41 AM

Ind vs NZ : भारत आणि न्यूझीलंड, विश्वचषक 2023 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेले दोन संघ रविवारी 22 ऑक्टोबर रोजी जगातील सर्वात सुंदर स्टेडियम, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन, धर्मशाला येथे एकमेकांसमोर उभे ठाकतील. या स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडने आतापर्यंतचे चारही सामने जिंकले आहेत. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांना पराभवाचा धक्का बसला आहे. गेल्या 20 वर्षांपासून वर्ल्ड कप मॅचेसमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारत जिंकलेला नाही. हा सामना जिंकून टीम इंडियाला केवळ विजयाचा दुष्काळ संपवायचा नाही तर २०१९ विश्वचषकातील उपांत्य फेरीतील पराभवाचा बदलाही घ्यायचा आहे.  

20 वर्षांत न्यूझीलंडविरुद्ध केवळ एक विजय; आता जिंकायचं असेल तर या 4 गोष्टी Must.  येथे वाचा सविस्तर...

07:52 AM

IND vs NZ Weather Update: भारत-न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं सावट? 

हिमाचल प्रदेशात हवमान खात्याकडून पुढच्या 48 तासांत वातावरण खराब असून पाऊस होणार असल्याची माहिती देण्यात आलीय. हिमाचल प्रदेशात उंच पर्वतीय भागात हलकी बर्फवृष्टी आणि सखल भागात पावसाची माहिती देण्यात आली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात धरमशालेत येथे होणाऱ्या सामन्याकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. येथे क्लिक करून वाचा सविस्तर

07:49 AM

IND vs NZ : टीम इंडिया दुहेरी संकटात! ईशान आणि सूर्यकुमारही खेळणार नाही सामना? जाणून घ्या कारण

वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार सुरूवात केलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी इशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) उपस्थित असणार नाहीत, अशी माहिती समोर आलीये. त्याचं कारण काय? जाणून घ्या येथे क्लिक करुन...

07:47 AM

पॉइण्ट्स टेबलमध्ये दोन्ही संघांची स्थिती काय?

पॉइण्ट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी न्यूझीलंडचा संघ आहे. दोन्ही संघांनी आपआपले चारही सामने जिंकले असूनही भारत दुसऱ्या स्थानी तर न्यूझीलंड पहिल्या स्थानी आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे नेट रन रेट. भारताचा नेट रन रेट +1.659 इतका आहे. तर न्यूझीलंडचा नेट रन रेट +1.923 इतका आहे. त्यामुळेच न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो अव्वल स्थानी असेल.

fallbacks

07:43 AM

भारतासमोर मोठं आव्हान...

वर्ल्ड कप 2023 मधील  पहिल्या चार सामन्यात धमाकेदार अंदाजात विजय मिळवल्यानंतर आता पाचव्या विजयासाठी भारतीय संघ सज्ज असला तरी त्यांच्या समोर कडवं आव्हान आहे ते न्यूझीलंडच्या संघाचं. दोन्ही संघ आतापर्यंत या स्पर्धेत अजेय राहिले आहेत. आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंडचा संघ 13 वेळा आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमने-सामने आले आहेत. त्यापैकी 10 वेळा न्यूझीलंडने भारताला पराभूत केलं आहे. त्यामुळे आजचा सामना भारतासमोरील खरं आव्हान आहे. 

Read More