Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

IND vs PAK LIVE: भारत पाकिस्तान उर्वरित सामना 'रिझर्व्ह दिवशी'; आजचा दिवस पावसामुळे पाण्यात..

Asia Cup, India vs Pakistan : पहिला सामना पावसाने धुवून निघाल्यानंतर आता रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला खेळवला जाणार जातोय.

IND vs PAK LIVE: भारत पाकिस्तान उर्वरित सामना 'रिझर्व्ह दिवशी'; आजचा दिवस पावसामुळे पाण्यात..
LIVE Blog

India vs Pakistan Asia Cup Live Score​ : सध्या श्रीलंकेत सुरू असलेल्या आशिया कपमध्ये (Asia Cup) दुसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान (IND VS PAK) यांच्या सामना खेळवला जाणार आहे. पहिला सामना पावसाला वाहिल्यानंतर आता दोन्ही संघ जिंकण्याच्या दृष्टीकोनातून मैदानात उतरतील. मात्र, रविवारीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता क्रिडाप्रेमींची चिंता वाढलीये. मात्र, सामना झाला तर कोण बाजी मारणार? भारत की पाकिस्तान?  याकडे सर्वांचं लक्ष लागंलय.

10 September 2023
20:54 PM

IND vs PAK  Match On Reserve Day : भारत पाकिस्तान सामन्यात रिझर्व्ह डे ठेवला गेल्याने आता सामना उद्या खेळवला जाणार आहे. सामना पहिल्यापासून सुरू होणार नसून उद्या आजच्या चालू परिस्थितीत सामना खेळवला जाईल. म्हणजेच उद्या भारताची फलंदाजी 25 व्या ओव्हरपासून सुरू होईल.

20:02 PM

भारत पाकिस्तान सामन्याची संभाव्य परिस्थिती -

1. आज पूर्ण करण्यास प्राधान्य असणार आहे. 
2.आजचा सामना पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानच्या फलंदाजीसाठी किमान 20 षटकांची गरज...
3. 20 षटकांचा खेळ झाल्यास पाकिस्तान 181 धावांचे आव्हान देण्यात येईल.
4. 20 षटके शक्य नसल्यास राखीव दिवसात म्हणजे उद्या सामना होणार आहे.
5. आज सामना झाला नाही तर उद्या भारत आज थांबला तिथून सुरू करेल.

19:31 PM

डकवर्थ लुईस नियमानुसार, उशिरा पाऊस थांबला तर... पाकिस्तानला 20 षटकांत 181 धावा, 21 षटकांत 187 धावा, 22 षटकांत 194 धावा, 23 षटकांत 200 धावा आणि 24 षटकांत 206 धावा आव्हान मिळू शकतं.

18:14 PM

भारत-पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आलीये... कोलंबोमध्ये पाऊस थांबला असून कव्हर काढले आहेत.

17:07 PM
16:55 PM

भारत पाकिस्तान सामन्यात पावसाची एन्ट्री झालीये. टीम इंडियाने 24 ओव्हरमध्ये 147 धावा मैदानात केल्या आहेत. केएल राहुल 17 धावा अन् विराट कोहली 8 धावांवर खेळतोय.

IND 147/2 (24.1)

16:22 PM

शाहीन अन् हॅरिसला जमलं नाही ते शाबादने करून दाखवलं. टीम इंडियाला पहिला धक्का बसला आहे. रोहित शर्मा 56 धावा करून बाद झाला. त्यानंतर आता विराट कोहली मैदानात आलाय.

16:03 PM

शुभमन गिलने धमाकेदार सुरूवात करत टीम इंडियाला सुरूवात करून दिली. तर त्यानंतर रोहितने दम दाखवला. शाबाद खानला चार चांद दाखवत रोहितने पूर्ण कसर भरून काढली. त्याचबरोबर आता टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत.

15:59 PM

टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलने धमाकेदार अर्धशतक पूर्ण केलंय. 37 बॉलमध्ये त्याने धुंवाधार फलंदाजी करत 50 धावा पूर्ण केल्या.

15:56 PM
15:38 PM

कॅप्टन रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरूवात केली आहे. शुभमन गिलने पहिल्या पाच ओव्हरमध्ये तीन फोर खेचत पाकिस्तानच्या बॉलिंग लाईनअपला तगडं उत्तर दिलंय.

14:37 PM

पाकिस्तानविरूद्ध टीम इंडियाची प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.

 

14:33 PM

रोहित शर्माने टीममध्ये केले 2 मोठे बदल

के.एल राहुल आणि जसप्रीत बुमराहचं झालं कमबॅक, तर श्रेयस अय्यरला बाहेरचा रस्ता

 

 

14:32 PM

पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझमने जिंकला टॉस, टीम इंडियाला दिलं प्रथम फलंदाजीचं निमंत्रण

14:29 PM

भारत-पाकिस्तान सामन्यांची आकडेवारी

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 133 वनडे सामने खेळले गेले आहेत. यात पाकिस्तानने 73 सामने जिंकले आहेत, तर भारतीय संघाने 55 सामने जिंकले आहेत. पाच सामने अनिर्णित राहिले. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले. 

14:21 PM

कोलंबोमध्ये दोन्ही टीमचा रेकॉर्ड

कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारताने 46 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 23 सामने जिंकले आणि 19 सामने गमावले. चार सामने अनिर्णित राहिले. त्याचबरोबर या मैदानावर पाकिस्तानने 24 वनडे सामने खेळले आहेत. त्यांनी 14 सामने जिंकले आणि आठ गमावले. दोन सामने अनिर्णित राहिले.

14:19 PM

कोलंबोमध्ये सध्या ऊन पडलंय आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावाही केला जातोय की, संध्याकाळी 7 वाजण्यापूर्वी पाऊस पडण्याची शक्यता नाही.

14:16 PM
10:35 AM

10 तारखेला होणाऱ्या सामन्यावर पावसाचं सावट पाहता आशियाई क्रिकेट काऊंसिलने ( Asian Cricket Cousil ) मोठा निर्णय घेत भारत - पाकिस्तान सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवला आहे. त्यानुसार 11 सप्टेंबर रोजी हा सामना खेळवण्यात येईल. मात्र जर 11 तारखेला देखील हा सामना पूर्ण होऊ शकला नाही तर कोणती टीम पुढे जाणार? पाहा-

Asia Cup 2023: 'रिझर्व्ह डे'ला IND-PAK सामना पावसाने रद्द झाला तर कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? पाहा कसं आहे समीकरण

 

08:38 AM

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे पाहता येईल?

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे स्टार स्पोर्ट्स चॅनलवर थेट प्रक्षेपण होणार आहे. हा सामना तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या चॅनेलवर पाहू शकता. त्याच वेळी डीडी स्पोर्ट्सवर देखील सामना फ्री दिसणार आहे

08:08 AM

आज होणाऱ्या सामन्यात पुन्हा एकदा टीम इंडियाचे फलंदाज आणि शाहीन आफ्रिदी यांचा सामना होणार आहे. मात्र त्याने सामन्यापूर्वी केलेल्या या वक्तव्यामुळे भारतीय चाहते हैराण झाले आहेत. पाहा नेमकं काय म्हणालाय, आफ्रिदी-

Ind vs Pak सामन्यापूर्वी शाहीन आफ्रिदी गरजला; रोहित शर्माला दिली 'ही' धमकी! 

 

01:22 AM

संभाव्य भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.

01:20 AM

सामन्यासाठी खेळपट्टी कशीय?

प्रेमदासा स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांना पोषक आहे. मैदानाची आऊटफिल्डही वेगवान आहे. तीन दिवसांपासून कोलंबोमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे आऊटफिल्ड स्लो होऊ शकते.

01:19 AM

पाकिस्तानचा संघ जाहीर

पाकिस्तानचा संघ | बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, आगा सलमान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.

01:17 AM

पुन्हा पावसाचा खोळंबा?

रविवारी कोलंबोध्ये दिवसभर पाऊस कोसळण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, रविवारी सकाळपासूनच पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दिवसभरात सरासरी 70 टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

Read More