Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Sunil Gavaskar: असं का सनी भाई? खेळाडूंना अहंकारी म्हणत सुनील गावस्करांनी सांगितला सेहवागचा 'तो' किस्सा!

Sunil Gavaskar on New Team India: टीम इंडियाच्या सध्याच्या खेळाडूंना दुसऱ्याकडे मदत मागायला आवडत नाही कारण त्यांचा अहंकार आड येतो, असं म्हणत गावस्कर यांनी खेळाडूंना सुनावलं आहे.

Sunil Gavaskar: असं का सनी भाई? खेळाडूंना अहंकारी म्हणत सुनील गावस्करांनी सांगितला सेहवागचा 'तो' किस्सा!

Sunil Gavaskar on Virender Sehwag: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये टीम इंडियाची (Team India) सुमार कामगिरी राहिली. त्यामुळे दुसऱ्यांदा देखील फायनलमध्ये पोहोचून टीम इंडियाला टेस्ट वर्ल्ड कप जिंकता आला नाही. त्यामुळे टीम इंडियावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. अशातच आता लिटल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंवर ताशेरे ओढले. भारताचे आताचे खेळाडू खूप गर्विष्ठ आहेत, असं सुनील गावस्कर म्हणाले आहेत. त्याचं कारण देखील सांगितलं. त्यावेळी त्यांनी वीरेंद्र सेहवागचा (Virender Sehwag) किस्सा सांगितला.

टीम इंडियाच्या सध्याच्या खेळाडूंना दुसऱ्याकडे मदत मागायला आवडत नाही कारण त्यांचा अहंकार आड येतो, असं म्हणत गावस्कर यांनी खेळाडूंना सुनावलं आहे. सचिन तेंडुलकरपासून ते राहुल द्रविडपर्यंत त्यांच्यातील कमतरता जाणून घेण्यासाठी माझ्याकडे यायचे, पण गेल्या 5- 10 वर्षांपासून एकही फलंदाज सल्ला घेण्यासाठी आला नाही.  सचिन, द्रविड आणि लक्ष्मण यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी अहंकार बाजूला ठेऊन नेहमी सल्ला बाजूला, असं लिटल मास्टर म्हणतात.

सेहवागचा किस्सा

एकदा सेहवाग फॉर्ममध्ये नव्हता. अचानक मी वीरेंद्र सेहवागला फोन केला. वीरू तू तुझा ऑफ स्टंप गार्ड पाहिला आहेस? असा सवाल मी त्याला केला. त्याला नेमकं काय ते समजलं नाही. .. का सनी भाई? असं त्याने विचारलं. तू चांगल्या फूटवर्कसाठी ओळखला जात नाही. ज्या बॉलवर तू आऊट होतो, त्याची तुला कल्पना नसते. त्यामुळे बॉलपासून तू दूर राहतो. जर तू ऑफ स्टंप अडवून खेळलास, तर बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आहे की आत याची तुला कल्पना येईल, असा सल्ला त्याला दिला होता. त्यानंतर सेहवाग चांगली फलंदाजी करू लागला, असं गावस्कर (Sunil Gavaskar on Virender Sehwag) म्हणतात.

आणखी वाचा -  'मला फार दु:ख झालं, ड्रेसिंग रुममध्ये...', WTC Final वर अखेर आश्विनने सोडलं मौन; पाहा Video

दरम्यान, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण जेव्हा खेळायचे तेव्हा मला ते नियमित भेटायचे. आमच्यात चर्चा होत होती. आता असं होत नाही, अशी खंत देखील त्यानी बोलून दाखवली. मला रोहितकडून खूप अपेक्षा होत्या. भारतात सामना जिंकणं वेगळं आहे, परंतु जेव्हा तुम्ही परदेशात चांगली कामगिरी करता तेव्हा ती खरोखरच कसोटी असते. इथंच त्याची कामगिरी थोडी निराशाजनक झाली आहे, असंही गावस्कर म्हणाले आहेत.

Read More